नेपियर, भारत विरुद्ध न्यूझीलंड - पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात केली. गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहलीने दमदार फलंदाजी करत भारताचा विजय निश्चित केला. या विजयासह भारतीय संघाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.न्यूझीलंडला अवघ्या 157 धावांत गुंडाळल्यानंतर माफक आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या भारताला शिखर धवन आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली. दरम्यान, रोहित शर्मा आज मोठी खेळी खेळण्यात अपयशी ठरला. डग ब्रेसवेलने त्याला वैयक्तिक 11 जागांवर गुप्टिलकडे झेल देण्यास भाग पाडले. त्यानंतर शिखर धवन आणि कर्णधार विराट कोहली यांनी दुसऱ्या विकेटसाठी 91 धावांची भागीदारी करत भारताचा विजय निश्चित केला. यादरम्यान, सनस्ट्राइकमुळे खेळ थांबवावा लागल्याने भारताला 49 षटकांत 156 धावांचे सुधारित लक्ष्य देण्यात आले. त्यानंतर शिखर धवनने आपले एकदिवसीय क्रिकेटमधील 26 वे अर्धशतकही पूर्ण केले. मात्र चांगली फलंदाजी करत असलेला विराट 45 धावांवर बाद झाला. अखेरीस शिखर धवन ( नाबाद 75) आणि अंबाती रायुडू ( नाबाद 13) यांनी भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. तत्पूर्वी, भारतीय गोलंदाजांनी त्यांची भूमिका चोख वटवताना यजमान न्यूझीलंडला पहिल्या वन डे सामन्यात 157 धावांवर गुंडाळले. मोहम्मद शमी, कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांनी किवींच्या धावांवर लगाम लावला आणि त्यांच्या फलंदाजांना मोठी खेळी करण्यापासून रोखले. कुलदीपने चार, शमीने तीन आणि युझवेंद्र चहल याने दोन बळी टिपले. तर केदार जाधवनेही एक विकेट काढत आपली उपयुक्तता सिद्ध केली. न्यूझीलंडकडून कर्णधार केन विलियम्सनने एकाकी झुंज देत 64 धावांची खेळी केली.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- धवनचा धमाका, पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात
धवनचा धमाका, पहिल्या वनडेत न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात
पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडवर आठ गडी राखून मात केली.
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 2:08 PM