भारताचा लंकेवर १३५ धावांनी विजय

पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंकेचा १३५ धावांनी पराभव करीत २-२ अशी बरोबरी साधली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2018 04:12 AM2018-08-08T04:12:46+5:302018-08-08T04:12:50+5:30

whatsapp join usJoin us
India beat Sri Lanka by 135 runs | भारताचा लंकेवर १३५ धावांनी विजय

भारताचा लंकेवर १३५ धावांनी विजय

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मोरातुवा (श्रीलंका) : सलामीवीर देवदत्त पदिक्कलची(७१) संयमी खेळी आणि गोलंदाजांच्या सांघिक कामगिरीच्या बळावर भारताच्या १९ वर्षाखालील संघाने पाच सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील चौथ्या सामन्यात श्रीलंकेचा १३५ धावांनी पराभव करीत २-२ अशी बरोबरी साधली.
आर्यन जुयाल(६०)आणि यश राठोड(५६) यांनीही भारतासाठी अर्धशतके ठोकताच ५० षटकांत ६ बाद २७८ पर्यंत मजल गाठता आली. श्रीलंका संघ ३७.२ षटकांत १४३ धावांत गारद झाला. भारताकडून आयुष बडोनी आणि हर्ष त्यागी यांनी प्रत्येकी तीन गडी बाद केले.
नाणेफेक जिंकून फलंदाजी घेणाऱ्या भारताकडून देवदत्तने पवन शाह(३६) सोबत दुसºया गड्यासाठी ९४ धावांची भागीदारी केली. त्यानंतर जुयाल- राठोड जोडीने चौथ्या गड्यासाठी ९२ धावांची भागीदारी करीत धावसंख्येला आकार दिला. अखेरच्या टप्प्यात समीर चौधरीने १६ चेंडूंवर नाबाद २४ धावा कुटल्या. अविष्का लक्षण आणि सनदू मेंडिस यांनी लंकेकडून प्रत्येकी दोन गडी बाद केले. पाठलाग करणाºया लंकेची सुरुवात डळमळीत झाली. सलामीचा कामिल मिशारा भोपळा न फोडताच बाद झाला. दुसरा सलामीवीर नावोद परनाविधान (४५)आणि कर्णधार निपून परेरा(३६)यांनी दुसºया गड्यासाठी ६० धावा केल्या. तथापि मधली फळी कोसळताच लंकेचा डाव १४३ धावांत संपुष्टात आला. उभय संघांदरम्यान पाचवा आणि अखेरचा सामना याच ठिकाणी १० आॅगस्ट रोजी खेळला जाईल. (वृत्तसंस्था)

Web Title: India beat Sri Lanka by 135 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.