India beat West Indies : महाराष्ट्राचे संस्कार!; Smriti Mandhana ने प्लेअर ऑफ दी मॅचची ट्रॉफी हरमनप्रीत कौरसोबत केली शेअर

ICC Women's World Cup - भारतीय महिला संघाने शनिवारी बलाढ्य वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला. गतविजेत्या इंग्लंड व यजमान न्यूझीलंडला पराभूत करणाऱ्या वेस्ट इंडिजचा विजयरथ भारतीय महिलांनी रोखला.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2022 01:46 PM2022-03-12T13:46:51+5:302022-03-12T13:58:08+5:30

whatsapp join usJoin us
India beat West Indies, Smriti Mandhana shares her Player of the Match Trophy with Harmanpreet Kaur | India beat West Indies : महाराष्ट्राचे संस्कार!; Smriti Mandhana ने प्लेअर ऑफ दी मॅचची ट्रॉफी हरमनप्रीत कौरसोबत केली शेअर

India beat West Indies : महाराष्ट्राचे संस्कार!; Smriti Mandhana ने प्लेअर ऑफ दी मॅचची ट्रॉफी हरमनप्रीत कौरसोबत केली शेअर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Women's World Cup - भारतीय महिला संघाने शनिवारी बलाढ्य वेस्ट इंडिजवर मोठा विजय मिळवला. गतविजेत्या इंग्लंड व यजमान न्यूझीलंडला पराभूत करणाऱ्या वेस्ट इंडिजचा विजयरथ भारतीय महिलांनी रोखला. आजच्या लढतीत भारताच्या ३१८ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संपूर्ण संघ १६२ धावांवर माघारी परतला. भारताने १५५ धावांनी हा सामना जिंकून  ICC Women's World Cup स्पर्धेच्या गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले. 

स्मृती मानधनाच्या १२३ आणि हरमनप्रीर कौरच्या १०९ धावांच्या खेळीनंतर स्नेह राणा ( ३-२२), मेघना सिंग ( २-२७) आणि झुलन गोस्वामी, राजेश्वरी गायकवाड व पूजा वस्त्राकर यांच्या प्रत्येकी १ विकेट्सने हा विजय मिळवून दिला. महिला वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक ४० विकेट्स घेण्याची ऐतिहासिक कामगिरी झुलन गोस्वानीने नावावर केली. आहे. न्यूझीलंडमध्ये झुलनने सर्वाधिक २४ विकेट्स घेताना नीतू डेव्हिडचा २३ विकेट्सचा विक्रम मोडला. या सामन्यात स्मृती मानधनाला प्लेअर ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले, परंतु तिने ही ट्रॉफी हरमनप्रीत कौरसोबत संयुक्तपणे स्वीकारली. 


प्रथम फलंदाजी करताना भारताला स्मृती व यास्तिका भाटीया यांनी ४९ धावांची सलामी दिली. भाटीया ३१ धावांवर बाद झाल्यानंतर भारताच्या तीन विकेट्स धडाधड पडल्या. कर्णधार मिताली राज ( ५), दीप्ती शर्मा ( १५) हे माघारी परतल्यामुळे भारताची अवस्था ३ बाद ७८ अशी झाली. त्यानंतर स्मृती व हरमनप्रीत यांनी १८४ धावांची विक्रमी भागीदारी केली. भारताकडून वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वोत्तम भागीदारी ठरली याआधी पूनम राऊत आणि थिरूष कामिनी यांनी २०१२ साली १७५ धावांची भागीदारी केली होती.  

महिला वनडे सामन्यात पाच किंवा त्यापेक्षा त्याच्या खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येताना शतक झळकावणारी हरमनप्रीत कौर ही पहिली भारतीय महिला ठरली. यापूर्वी रूमेली धार हिने २००८ मध्ये पाकिस्तान विरुद्ध नाबाद ९२ धावा केल्या होत्या.


वेस्ट इंडिजच्या डिएंड्रा डॉटीन व हायली मॅथ्यूज यांनी पहिल्या विकेटसाठी १०० धावा जोडल्या. पण, पुढील ६२ धावांत त्यांचा संपूर्ण संघ माघारी परतला. डॉटीनने ६२, तर मॅथ्यूजने ४३ धावा केल्या 

Web Title: India beat West Indies, Smriti Mandhana shares her Player of the Match Trophy with Harmanpreet Kaur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.