ICC Test Ranking | नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) नुकत्याच जाहीर केलेल्या कसोटी क्रमवारीत भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC Final 2023) अंतिम सामन्यासापूर्वी टीम इंडियाचे मनोबल वाढवणारी बातमी आयसीसीने दिली आहे. आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाला मागे टाकून भारतीय संघाने पहिला क्रमांक पटकावला आहे. १२१ गुणांसह टीम इंडिया पहिल्या स्थानावर आहे, तर ११६ गुणांसह ऑस्ट्रेलियाची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. भारतीय संघ आताच्या घडीला कसोटी आणि ट्वेंटी-२० क्रमवारीत पहिल्या स्थानावर आहे, तर वन डेत तिसऱ्या स्थानावर स्थित आहे.
icc कसोटी क्रमवारी
- भारत - १२१ गुण
- ऑस्ट्रेलिया - ११६ गुण
- इंग्लंड - ११४ गुण
- दक्षिण आफ्रिका - १०४ गुण
- न्यूझीलंड - १०० गुण
भारतीय संघ आयपीएल झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाविरूद्ध जागतिक अजिंक्य स्पर्धेचा अंतिम सामना खेळणार आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना हा ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. काही दिवसांपूर्वीच बीसीसीआयने या महत्त्वाच्या सामन्यासाठी भारतीय संघ जाहीर केला आहे.
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी १५ सदस्यीय भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: INDIA BECOME THE NEW NO ONE RANKED TEST TEAM, India pip Australia at the top of Test Team Rankings ahead of WTC Final
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.