IND vs AUS, 2nd Test : एक नंबर! भारतीय संघाने इतिहास रचला; दुसऱ्या कसोटीपूर्वी रोहित अँड टीमला गूड न्यूज

IND vs AUS, 2nd Test : ICC Men's Rankings - भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2023 02:03 PM2023-02-15T14:03:10+5:302023-02-15T14:03:33+5:30

whatsapp join usJoin us
India becomes the second team & first Asian team to be number 1 in the same time in ICC ranking; Team India number one in ICC Men's Rankings all format  | IND vs AUS, 2nd Test : एक नंबर! भारतीय संघाने इतिहास रचला; दुसऱ्या कसोटीपूर्वी रोहित अँड टीमला गूड न्यूज

IND vs AUS, 2nd Test : एक नंबर! भारतीय संघाने इतिहास रचला; दुसऱ्या कसोटीपूर्वी रोहित अँड टीमला गूड न्यूज

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs AUS, 2nd Test : ICC Men's Rankings - भारतीय संघाने नागपूर कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. रोहित शर्माचे शतक, रवींद्र जडेजाची अष्टपैलू कामगिरी, अक्षर पटेलची दमदार फलंदाजी आणि आर अश्विनची फिरकी, याच्या जोरावर भारताने पहिली कसोटीत एक डाव व १३२ धावांनी ही कसोटी जिंकली. या विजयाचा भारतीय संघाला आणि भारतीय खेळाडूंना आयसीसी कसोटी क्रमवारीत खूप मोठा फायदा झाला आहे. भारतीय संघ कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे. ट्वेंटी-२०, वन डे व कसोटी या तीनही फॉरमॅटमध्ये आता भारतीय संघ नंबर वन आहे आणि आशियातील संघाने असा पराक्रम करण्याची ही पहिलीच वेळ ठरली. जगातील हा दुसरा संघ ठरला आहे.

स्मृती मानधना ट्वेंटी-२० वर्ल्ड कपच्या दुसऱ्या सामन्यालाही मुकणार? आज भारत-वेस्ट इंडिज सामना होणार

भारताचा फिरकीपटू आर अश्विन हा पुन्हा एकदा टॉप टेनमध्ये आला आहे आणि रवींद्र जडेजानेही मोठी झेप घेतली आहे.  अश्विनने दुसऱ्या डावात ५-३७ अशी आणि पहिल्या डावात ३-४२ अशी कामगिरी केली. ३६ वर्षीय गोलंदाज कसोटी क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. ऑस्ट्रेलियन गोलंदाज पॅट कमिन्स नंबर वन वर आहे. जडेजानेही नागपूर कसोटीत पहिल्या डावात ५-४७ अशी गोलंदाजी केली होती आणि दुसऱ्या डावात २-३४ अशी कामगिरी केली.  


भारताचा कर्णधार रोहित शर्मा याने नागपूर कसोटीत शतक झळकावले होते आणि तोही १०व्या क्रमांकावरून ८व्या क्रमांकावर आला आहे. रोहितने नागपूरमध्ये १२० धावांची खेळी केली होती. भारताचा अष्टपैलू अक्षर पटेल हा सहा स्थानांच्या सुधारणेसह सातव्या क्रमांकावर आला आहे.   

भारताचे व खेळाडूचे वर्चस्व

  • कसोटीत नंबर १
  • ट्वेंटी-२० त नंबर १
  • वन डे त नंबर १
  • ट्वेंटी-२० नंबर वन फलंदाज - सूर्यकुमार यादव
  • वन डेत नंबर वन गोलंदाज - मोहम्मद सिराज
  • कसोटीत नंबर वन ऑल राऊंडर - रवींद्र जडेजा
  • कसोटीत नंबर दोन गोलंदाज - आर अश्विन
  • कसोटीत नंबर दोन ऑल राऊंडर - आर अश्विन
  • ट्वेंटी-२०त नंबर दोन ऑल राऊंडर - हार्दिक पांड्या 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: India becomes the second team & first Asian team to be number 1 in the same time in ICC ranking; Team India number one in ICC Men's Rankings all format 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.