Join us

legends league cricket 2023 : गौतम गंभीरचा पहिल्याच चेंडूवर 'कार्यक्रम', रैनाच्या संघाचा दबदबा

legends league cricket 2023 Live : सध्या लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2023 18:09 IST

Open in App

India Capitals vs Urbanizers Hyderabad । रांची : सध्या लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचा थरार रंगला आहे. जगभरातील माजी खेळाडू या स्पर्धेत सहभागी झाले असून सहा संघ एका ट्रॉफीसाठी मैदानात आहेत. आज इंडिया कॅपिटल्स आणि अर्बनराईजर्स हैदराबाद यांच्यात रांची येथे सामना होत आहे. ९ डिसेंबर रोजी या स्पर्धेचा अंतिम सामना सुरत येथे होणार आहे. भारतीय संघाचा माजी खेळाडू आणि विद्यमान खासदार गौतम गंभीर इंडिया कॅपिटल्स संघाचा भाग आहे. मात्र, आज गंभीरला पहिल्याच चेंडूवर माघारी परतावे लागले.

ख्रिस म्पोफूच्या पहिल्याच चेंडूवर गंभीर फसला अन् एलबीडब्ल्यू बाद झाला. ख्रिसने टाकलेला चेंडू इनस्विंग होत स्टम्पाच्या दिशेने गेला आणि गंभीरला आपली विकेट गमवावी लागली. गंभीरला एकही धाव न काढता स्वस्तात माघारी परतावे लागले. तत्पुर्वी, अर्बनराईजर्स हैदराबादने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांत ५ बाद १८९ धावा केल्या. त्यामुळे इंडिया कॅपिटल्ससमोर १९० धावांचे तगडे आव्हान आहे. 

लीजेंड्स लीग क्रिकेट २०२३ संघ -

  1. इंडिया कॅपिटल्स
  2. गुजरात जायंट्स
  3. भिलवारा किंग्स
  4. मनिपाल टायगर्स 
  5. साउथर्न  सुपरस्टार्स
  6. अर्बनराईजर्स हैदराबाद

 

टॅग्स :गौतम गंभीरसुरेश रैनाटी-20 क्रिकेट