ICC पुरस्कार सोहळ्यात 'विराट एके विराट'; एकाच वर्षी जिंकल्या तीनही मानाच्या ट्रॉफी

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी ऐतिहासिक भरारी घेतली.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2019 11:52 AM2019-01-22T11:52:46+5:302019-01-22T11:54:44+5:30

whatsapp join usJoin us
India captain Virat Kohli becomes the first player to win ICC all three of top awards in 2018 | ICC पुरस्कार सोहळ्यात 'विराट एके विराट'; एकाच वर्षी जिंकल्या तीनही मानाच्या ट्रॉफी

ICC पुरस्कार सोहळ्यात 'विराट एके विराट'; एकाच वर्षी जिंकल्या तीनही मानाच्या ट्रॉफी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देभारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा भीमकाय पराक्रमआयसीसीच्या कसोटी व वन डे संघाचे नेतृत्व कोहलीकडेसर्वोत्तम क्रिकेटपटू, सर्वोत्तम वन डे व कसोटीपटू असे तीनही पुरस्कार नावावर

मुंबई : भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीने मंगळवारी ऐतिहासिक भरारी घेतली. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने जाहीर केलेल्या 2018च्या कसोटी व वन डे संघाचे नेतृत्व कोहलीच्या खांद्यावर सोपवण्यात आले. त्याचबरोबर वर्षातील सर्वोत्तम खेळाडूला दिली जाणारी सर गार्फिल्ड सोबर्स ट्रॉफी त्याने पटकावली. सोबतच वर्षातील सर्वोत्तम कसोटी व वन डे खेळाडूचा पुरस्कारही त्याने नावावर केला. एकाच वर्षी हे तिन्ही पुरस्कार जिंकणारा तो पहिलाच खेळाडू ठरला आहे. 

2018 वर्षात कोहलीने 13 कसोटी सामन्यांत 55.08च्या सरासरीने 1322 धावा केल्या आहेत आणि त्यात पाच शतकांचा समावेश आहे. 14 वन डे सामन्यांत त्याने 133.55 च्या सरासरीने 1202 धावा चोपून काढल्या. वन डेत त्याने मागील वर्षात सहा शतकं ठोकली, तर 10 ट्वेंटी-20 सामन्यांत त्याने 211 धावा केल्या. दिल्लीचा 30 वर्षीय कोहली 2008 मध्ये पहिल्यांदा प्रकाशझोतात आला. त्याने 2008 साली भारताला 19 वर्षांखालील वर्ल्ड कप जिंकून दिला. त्यानंतर वरिष्ठ संघात त्याने यशाचे एक एक शिखर पादाक्रांत केले. 

सर्वोत्तम कसोटी खेळाडूचा पुरस्कार कोहलीने प्रथमच जिंकला आहे, तर त्याने सलग दुसऱ्यांदा वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. त्याने 2018 मध्ये 37 सामन्यांत 47 डावांमध्ये 68.37च्या सरासरीने एकूण 2735 धावा केल्या आहेत. त्यात 11 शतकं आणि 9 अर्धशतकांचा समावेश आहे. कोहलीने गतवर्षी सर गार्फिल्ड ट्रॉफी आणि वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार जिंकला होता. त्याशिवाय त्याने 2012 मध्ये वन डेतील सर्वोत्तम खेळाडूचा मान पटकावला आहे. 









 

Web Title: India captain Virat Kohli becomes the first player to win ICC all three of top awards in 2018

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.