भारत आणि चीन सैनिकांमध्ये १५ आणि १६ जून रोज गलवान खोऱ्यात संघर्ष झाला. या परिसरात तैनात असलेले जवान जखमी झाले आहेत. त्यातील २० जणांन शहीद झाले. भारतीय लष्कर देशाच्या अखंडतेसाठी आणि संरक्षणासाठी कटीबद्ध आहे अशी प्रतिक्रिया भारतीय लष्काराने दिली आहे. भारतीय सूत्रांनुसार चीनच्या ४३ सैनिकांपैकी काहींचा मृत्यू तर काही गंभीररित्या जखमी झाल्याची माहिती आहे. या संघर्षात शहीद झालेल्या भारतीय जवानांना कर्णधार विराट कोहली, रोहित शर्मा यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
आपल्या देशाचे रक्षण करण्यासाठी गलवान खोऱ्यात शहीद झालेल्या जवानांच्या बलिदानाला सलाम. भारतीय जवानांएवढे निस्वार्थी आणि धाडसी कोणीच नाही. त्यांच्या कुटुंबीयाच्या दुःखात सहभागी आहोत, असे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीन ट्विट केलं.
रोहित शर्मानं ट्विट केलं की,''आपले रक्षण करण्यासाठी सीमेवर लढणाऱ्या खऱ्या नायकांना सलाम.''
Web Title: India China Faceoff: Virat kohli, Rohit Sharma salute brave soldiers who laid their lives fighting for motherland at galwan valley
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.