भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI हे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट बोर्ड आहे आणि याची जाण सर्वांना आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान ( Imran Khan) यानंही ते मान्य करताना BCCI जागतिक क्रिकेटला कंट्रोल करते असे मत मांडले. इंग्लंडनं मागील महिन्यात पाकिस्तान दौरा रद्द केल्या, परंतु भारताविरुद्ध तसं करण्याची हिम्मत ते करणार नाहीत, कारण त्यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, असेही ते म्हणाले.
India controls world cricket- इम्रान खान म्हणाले की,''सध्या खेळाडूपेक्षा पैसा अधिक महत्त्वाचा झाला आहे. भारत हा सर्वात श्रीमंत बोर्ड आहे आणि अशात त्यांच्याविरोधात कुणीही आवाज उठवण्याची हिम्मत करणार नाही. इंग्लंड ज्याप्रकारे पाकिस्तानशी वागला, तसे ते भारताशी वागले नसते. त्यांना माहित्येय की इथून प्रचंड पैसा येतोय आणि त्याचा त्यांनाही फायदा होतोय. खेळाडूंनाच नव्हे तर अनेक देशांच्या क्रिकेट संघटनांना भारताकडून पैसा मिळतोय. त्यामुळेच जागतिक क्रिकेट भारत कंट्रोल करतंय.''
रमीझ राजा काय म्हणाले होते?''पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा गाढा हा आयसीसीकडून मिळणाऱ्या ५० टक्के निधीतून चालतो आणि आयसीसीचा ९० टक्के निधी हा भारतातून येतो. जर भारतानं आयसीसीला निधी देण्यास नकार दिल्यास, PCB कोसळून जाण्याची भीती आहे आणि कारण PCBकडून आयसीसीला शून्य टक्के निधी मिळतो, हे सत्य आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेटला बळकट करण्याचा माझा प्रयत्न असेल,''असे रमीज राजा म्हणाले होते.