ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद

2021मध्ये भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर येत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 11:49 AM2020-05-27T11:49:32+5:302020-05-27T11:50:06+5:30

whatsapp join usJoin us
India could lose 2021 T20 World Cup hosting rights as BCCI fails to secure tax exemption svg | ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद

ICCचा मोठा दणका; BCCIला गमवावे लागेल 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कोरोना व्हायरसच्या संकटात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपवर अनिश्चिततेचं सावट आहे. ही स्पर्धा जवळपास रद्दच झाल्यात जमा आहे आणि 28 मे रोजी त्याची अधिकृत घोषणा अपेक्षित आहे. पण, यातच 2021मध्ये भारतात होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेबाबत मोठी बातमी समोर येत आहे. पुढील वर्षी  होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कपचे यजमानपद भारताकडून काढून घेतले जाऊ शकते. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) तशी धमकीच बीसीसीआयला दिल्याचे वृत्त आहे.

नक्की प्रकरण काय आहे ?

बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात करात सूट देण्यावरून गेल्या अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. 2021च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आयसीसीला भारत सरकारकडून करात सूट हवी आहे. ती मिळवण्यासाठी बीसीसीआयचे सर्व प्रयत्न अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आयसीसीनं सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या बीसीसीआयला खरमरीत मेल पाठवला आहे. त्यात त्यांनी ही स्पर्धा दुसरीकडे हलवण्याचे अधिकार आमच्याकडे असल्याचे मत व्यक्त केले गेले आहे.

बीसीसीआयला 18 मे पर्यंतची मुदत आयसीसीनं दिली होती. पण, ती 30 जूनपर्यंत वाढवून मिळावी अशी विनंती बीसीसीआयकडून करण्यात आली आहे. ''बीसीसीआयसोबतचा ICC Business Corporation करार 18 मे नंतर कधीही संपुष्टात आणू शकतो,''असे आयसीसीचे सल्लागार जॉनथन हॉल यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले,''करात सूट मिळवण्याच्या मुद्या सोडवण्यासाठी बीसीसीआयला बराच बराच वेळ देण्यात आला. आता आणखी वेळ देण्यात काहीच अर्थ नाही. IBCचा करार 30 जून 2020पर्यंत वाढवण्याची विनंती मान्य करण्यात अर्थ नाही.''

यापूर्वीही 2016मध्ये बीसीसीआय आणि आयसीसी यांच्यात करात सूट देण्याचा मुद्दा गाजला होता. बीसीसीआयला तेव्हाही अपयश आले होते आणि त्यामुळे आयसीसीला 20-30 मिलियनचे नुकसान सहन करावे लागले होते. आता पुढील वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेसाठी करात सूट न मिळाल्यास आयसीसीला 100 मिलियन डॉलरचा नुकसान सहन करावा लागू शकतो. बीसीसीआयनं लॉकडाऊनचं कारण पुढे करून आणखी मुदतवाढ मागितली आहे. 

सचिन तेंडुलकर माझ्या गोलंदाजीवर हूक किंवा पूल मारू शकत नव्हता; अख्तरनं सांगितला 2006चा किस्सा 

शोएब अख्तरच्या बाऊंसरवर घाबरला होता सचिन तेंडुलकर, बंद केले डोळे; पाकिस्तानी गोलंदाजाचा दावा

Happy Birthday Ravi Shastri: विराट कोहलीनं शास्त्री गुरुजींना म्हटलं शूर...

 

Web Title: India could lose 2021 T20 World Cup hosting rights as BCCI fails to secure tax exemption svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.