ठळक मुद्देभारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली बिनधास्तपणे बोलण्यासाठी आणि थट्टा-मस्करीसाठीही ओळखला जातो.काही दिवसांपूर्वी कोहली कॉमेडियन कपिल शर्माचा शोमध्ये गेला होता.कपिलने कोहलीला अनेक गंमतीशीर प्रश्न विचारले आणि कोहलीनेही त्याच्या संर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या बिनधास्त अंदाजात दिले.
क्रिकेटच्या मैदानावर आपल्या आक्रामक अंदाजासाठी ओळखला जाणारा भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) बिनधास्तपणे बोलण्यासाठी आणि थट्टा-मस्करीसाठीही ओळखला जातो. काही दिवसांपूर्वी कोहली कॉमेडियन कपिल शर्माचा शोमध्ये गेला होता. येथे कपिलने त्याला अनेक गंमतीशीर प्रश्न विचारले आणि कोहलीनेही त्याच्या संर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या बिनधास्त अंदाजात दिले. (India Cricket team captain kohli told which player runs away from girls in team india)
यावेळी कपिलने कोहलीला प्रश्न विचारला, की टीम इंडियातील असा कोणता खेळाडू आहे, जो मुलींपासून दूर-दूर पळतो? यावर कोहलीने, भारतीय कसोटी संघातील प्रमुख फलंदाज असलेल्या चेतेश्वर पुजाराचे नाव घेतले. एवढेच नाही, तर चेतेश्वर पुजारा नेहमीच मुलींपासून दूर पळतो. तो अत्यंत फोकस आणि शरीफ आहे. मी माझ्या आयुष्यात एवढा शरीफ मिलगा पाहिला नाही, असे कोहली म्हणाला.
महेंद्रसिंग धोनीला जे जमलं नाही ते Rishabh Pant ने करून दाखवलं; आर अश्विननंही मोठी झेप घेतली
कोहली म्हणाला, त्याचे नावही पुजारा आहे आणि तो दिवसातून पाच वेळा पूजाही करतो. एवढेच नाही, तर त्याच्या पत्नीचे नावही पूजा आहे. कोहलीच्या या उत्तरावर सर्वच जण जोर-जोरात हसले.
2010 मध्ये पुजाराने भारताकडून पहिला सामना खेळला -
आज पुजारा भारतीय संघातील नवीन वॉल अथवा द वॉल नावाने ओळखला जातो. त्याने ऑक्टोबर, 2010 मध्ये भारतासाठी आपला पहिला सामना खेळला होता. टेस्ट क्रिकेटच्या 83 सामन्यांत पुजाराने 47.17 च्या सरासरीने 6227 धावा केल्या आहेत. यात तीन दुहेरी शतकं, 18 शतकं आणि 29 अर्धशतकांचा समावेश आहे.
IPL 2021 Auction : आयपीएलमध्ये सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण? ही आहे यादी...
Web Title: India Cricket team captain kohli told which player runs away from girls in team india
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.