Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराची १२५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; आशियात अव्वल ठरून सर डॉन ब्रँडमन यांच्या पंक्तित पटकावले स्थान

भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara) कौंटी क्रिकेटमध्ये आखणी एक द्विशतकी खेळी करून ससेक्स ( Sussex) क्लबला मोठी धावसंख्या उभारून दिली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2022 01:33 PM2022-07-21T13:33:09+5:302022-07-21T13:33:37+5:30

whatsapp join usJoin us
India cricketer Cheteshwar Pujara becomes first Sussex batter in 125 Years after Ranjitsinhji to slam a Double Century at Lord's, he scored his 16th double century in First Class, which is the most by an Asian player  | Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराची १२५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; आशियात अव्वल ठरून सर डॉन ब्रँडमन यांच्या पंक्तित पटकावले स्थान

Cheteshwar Pujara : चेतेश्वर पुजाराची १२५ वर्षांपूर्वीच्या विक्रमाशी बरोबरी; आशियात अव्वल ठरून सर डॉन ब्रँडमन यांच्या पंक्तित पटकावले स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara) कौंटी क्रिकेटमध्ये आखणी एक द्विशतकी खेळी करून ससेक्स ( Sussex) क्लबला मोठी धावसंख्या उभारून दिली. पुजाराने  ४०३ चेंडूवर २१ चौकार व ३ षटकार खेचून ५३३ मिनिटांच्या खेळीत २३१ धावा चोपल्या. लॉर्ड्सवर द्विशतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला, तर ससेक्स क्लबच्या ११८ वर्षांच्या इतिहासात एकाच पर्वात तीन द्विशतकं करणारा तो पहिला फलंदाज ठरला. याहीपलिकडे पुजाराने आणखी एक विक्रम नोंदवला अन् थेट १२५ वर्षांनंतर कौंटी क्रिकेटमधे हा पराक्रम झाला.

ससेक्सने पहिल्या डावात ५२३ धावा चोपल्या आणि मिडलेसेक्स क्लबसमोर तगडे आव्हान ठेवले. टॉम अॅल्सोपसह कॅप्टन पुराजाने २००+ धावांची भागीदारी केली. टॉम १३५ धावांवर बाद झाला. डॅनिएल इब्राहिम ( ३६) व टॉम क्लार्क ( ३३) यांनीही योगदान दिले. पण, पुजाराने २३१ धावा चोपल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे १६ वे द्विशतक ठरले आणि आशियाई फलंदाजांमध्ये सर्वाधिक द्विशतकं आता पुजाराच्या नावावर आहेत. 

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकं
३७ - सर डॉन ब्रॅडमन
३६ - वॉल्टर हॅमोंड
२२ - पर्सी हेंड्रेन
१७ - हर्बर्ट सटक्लिफ व मार्क रामप्रकाश
१६ - चेतेश्वर पुजारा

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३०० 
८ - सर डॉन ब्रॅडमन
४ - बिल पोन्सफोर्ड व वॉल्टर हॅमोंड
३- चेतेश्वर पुजारा 

  • रंजितसिंह यांच्यानंतर ससेक्स क्लबकडून लॉर्ड्सवर द्विशतक करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. १२५ वर्षांपूर्वी रंजितसिंह यांनी हा पराक्रम केला होता. 

Web Title: India cricketer Cheteshwar Pujara becomes first Sussex batter in 125 Years after Ranjitsinhji to slam a Double Century at Lord's, he scored his 16th double century in First Class, which is the most by an Asian player 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.