भारताचा क्रिकेटपटू चेतेश्वर पुजाराने ( Cheteshwar Pujara) कौंटी क्रिकेटमध्ये आखणी एक द्विशतकी खेळी करून ससेक्स ( Sussex) क्लबला मोठी धावसंख्या उभारून दिली. पुजाराने ४०३ चेंडूवर २१ चौकार व ३ षटकार खेचून ५३३ मिनिटांच्या खेळीत २३१ धावा चोपल्या. लॉर्ड्सवर द्विशतक करणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला, तर ससेक्स क्लबच्या ११८ वर्षांच्या इतिहासात एकाच पर्वात तीन द्विशतकं करणारा तो पहिला फलंदाज ठरला. याहीपलिकडे पुजाराने आणखी एक विक्रम नोंदवला अन् थेट १२५ वर्षांनंतर कौंटी क्रिकेटमधे हा पराक्रम झाला.
ससेक्सने पहिल्या डावात ५२३ धावा चोपल्या आणि मिडलेसेक्स क्लबसमोर तगडे आव्हान ठेवले. टॉम अॅल्सोपसह कॅप्टन पुराजाने २००+ धावांची भागीदारी केली. टॉम १३५ धावांवर बाद झाला. डॅनिएल इब्राहिम ( ३६) व टॉम क्लार्क ( ३३) यांनीही योगदान दिले. पण, पुजाराने २३१ धावा चोपल्या. प्रथम श्रेणी क्रिकेटमधील हे त्याचे १६ वे द्विशतक ठरले आणि आशियाई फलंदाजांमध्ये सर्वाधिक द्विशतकं आता पुजाराच्या नावावर आहेत.
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतकं३७ - सर डॉन ब्रॅडमन३६ - वॉल्टर हॅमोंड२२ - पर्सी हेंड्रेन१७ - हर्बर्ट सटक्लिफ व मार्क रामप्रकाश१६ - चेतेश्वर पुजारा
प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सर्वाधिक ३०० ८ - सर डॉन ब्रॅडमन४ - बिल पोन्सफोर्ड व वॉल्टर हॅमोंड३- चेतेश्वर पुजारा
- रंजितसिंह यांच्यानंतर ससेक्स क्लबकडून लॉर्ड्सवर द्विशतक करणारा तो पहिलाच फलंदाज ठरला. १२५ वर्षांपूर्वी रंजितसिंह यांनी हा पराक्रम केला होता.