Join us

भारतीय संघाला ICC कडून मिळाली गुड न्यूज; ऑस्ट्रेलियापेक्षा कमी गुण, तरीही झाले टॉपर 

WTC25 standings :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा समारोप १-१ असा बरोबरीने झाला.

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 18:37 IST

Open in App

WTC25 standings  (Marathi News) :  भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेचा समारोप १-१ असा बरोबरीने झाला. भारताने दुसऱ्या कसोटीत ७ विकेट्स राखून विजय मिळवला. केप टाऊनमध्ये भारताचा हा पहिला कसोटी विजय ठरला आणि या विजयासोबतच भारताला आयसीसीकडून गोड बातमी मिळाली. भारताने केपटाऊनमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सात गडी राखून विजय मिळवत १२ महत्त्वपूर्ण गुण मिळवले आणि आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या तालिकेत अव्वल स्थान मिळवले. 

कसोटी क्रिकेटमधील १९३२ सालचा विक्रम तुटला; भारत-दक्षिण आफ्रिका सामना सर्वात 'छोटा' ठरला

दक्षिण आफ्रिकेने मालिकेतील पहिल्या सामन्यातील विजयानंतर WTC25 गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचले होते. पण, दुसऱ्या कसोटीतील पराभवामुळे त्यांची विजयाची टक्केवारी ही न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश प्रमाणेच ५०% पर्यंत खाली आली. दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी अभेद्य आघाडी घेतल्याने त्यांची विजयाची टक्केवारी १०० टक्के झाली होती. पण, भारताने दुसऱ्या कसोटीत पुनरामन केले आणि ७९ धावांचे लक्ष्य १२ षटकांत ३ बाद ८० धावा करून पार केले.  

मोहम्मद सिराज ( १५-६) व जसप्रीत बुमराह ( ६-६१) यांनी अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या डावात उल्लेखनीय मारा करून विजयाचा पाया रचला. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव ५५ धावांवर आणि दुसरा डाव १७८ धावांवर भारतीय गोलंदाजांनी गुंडाळला. दुसऱ्या डावात त्याच्यांकडून एडन मार्करमने शतकी खेळी केली. भारताकडून पहिल्या डावात रोहित शर्मा ( ३९), शुबमन गिल ( ३६) व विराट कोहली ( ४६) वगळल्यास अन्य फलंदाज अपयशी ठरले. भारताचा पहिला डाव १५३ असा गडगडला आणि ९८ धावांच्या आघाडीवर समाधान मानावे लागले. भारताकडून दुसऱ्या डावात यशस्वी जैस्वाल ( २८), विराट कोहली ( १२), शुबमन गिल ( १०) व रोहित शर्मा ( नाबाद १७) यांनी हातभार लावला.  

टॅग्स :जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धाभारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका