भारतानं १९७१नंतर प्रथमच ओव्हलवर कसोटी सामना जिंकण्याचा पराक्रम केला. भारताच्या या विजयात रोहित शर्माचे शतक, शार्दूल ठाकूरची अष्टपैलू कामगिरी आणि अन्य सहकाऱ्यांचे योगदान याचा मोलाचा वाटा आहे. भारताचा पहिला डाव १९१ धावांवर गडगडल्यानंतर दुसऱ्या डावात ४६६ धावांची आघाडी घेत इंग्लंडसमोर ३६८ धावांचे लक्ष्य ठेवले. खेळपट्टी व सलामीवीरांनी करून दिलेली सुरुवात लक्षात घेता इंग्लंड एक तर हा सामना जिंकेल किंवा अनिर्णीत राखेल, असेच वाटले. पण, लंच ब्रेकनंतर जसप्रीत बुमराह व रवींद्र जडेजानं डाव उलटवला अन् भारताचा विजय पक्का केला.
भारताच्या या विजयानंतर माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवाग यानं इंग्लंडची फिरकी घेतली. वीरूनं टीम इंडियाचे अभिनंदन केले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून इंग्लंडला चिमटे काढले. ''भारतीय संघ फक्त फिरकी घेणाऱ्या खेळपट्टीवर जिंकू शकतो, त्यांच्यासाठी हा खास मॅसेज,''असे वीरूनं ट्विट केलं.
इंग्लंडच्या कर्णधाराला होता विजयाचा विश्वास, पण भारताच्या 'या' खेळाडूनं लावली वाट
''आम्हाला विजयाची संधी होती, परंतु टीम इंडियाला श्रेय द्यायला हवं. या सामन्यातून काहीच हाती न लागल्यानं निराश झालो आहे. चेंडू रिव्हर्स होऊ लगला आणि तेथेच भारतीय गोलंदाजांनी बाजी मारली. पहिल्या डावात आणखी जास्तीच्या धावांची आघाडी घेता आली असती, तर निकाल काही वेगळा लागू शकला असता,''असेही रूट म्हणाला.
तो म्हणाला, ''जसप्रीत बुमराह हा जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. पाचव्या दिवशी लंच ब्रेकनंतर त्याच्या स्पेलनं सामन्याला कलाटणी दिली. त्याच्या त्या स्पेलनं सामनाच फिरवला.'' जसप्रीत बुमराहनं या लंच ब्रेकनंतर ओली पोप व जॉनी बेअरस्टो यांचा त्रिफळा उडवून कसोटी क्रिकेटमध्ये विकेट्सचे शतक पूर्ण केले. भारताकडून सर्वात कमी २४ डावांमध्ये १०० कसोटी विकेट्स घेणारा तो जलदगती गोलंदाज ठरला. त्यानं कपिल देव यांचा २५ डावांत १०० विकेट्सचा विक्रम मोडला.
Web Title: India Defeat England, Virender Sehwag Shares PM Modi’s Meme To Answer Critics
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.