बंगळुरू : कृष्णप्पा गौतम व कुलदीप यादवच्या शानदार गोलंदाजीनंतर अंकित बावणेच्या (२८*) जोरावर भारत अ संघाने मंगळवारी दुसऱ्या अनौपचारीक कसोटी सामन्यात आॅस्ट्रेलिया अ संघाचा ६ गडी राखून पराभव केला. यासह भारतीयांनी दोन सामन्यांची मालिका १-१ अशी बरोबरीत सोडवली.
गौतम (३/३९), कुलदीप यादव (३/४६) यांच्या शानदार गोलंदाजीमुळे भारत अ संघाने आॅस्ट्रेलिया अ संघाचा दुसरा डाव २१३ धावांत संपुष्टात आणला. यामुळे भारत अ संघाला आठ षटकांत विजयासाठी ५५ धावांचे लक्ष्य मिळाले. भारतीय संघाने श्रेयस अय्यर (३) व शुभमान गिल (४) यांना डावाची सुरुवात करण्यासाठी पाठवले; परंतु हे दोघेही स्वस्तात बाद झाले. श्रीकर भरत (१२) याने षटकार व चौकार मारला; परंतु तोही बाद झाल्यानंतर भारताची स्थिती ३.५ षटकांत ४ बाद २५ अशी झाली. आॅस्ट्रेलिया अ संघाने क्षेत्ररक्षकांना पसरवले होते; परंतु अंकित बावणेने पाचव्या षटकात ख्रिस ट्रेमेन याच्यावर हल्ला चढवत १६ धावा वसूल करुन भारताचा विजय निश्चित केला. अंकित १८ चेंडूंत ३ चौकारांसह २८ धावांवर नाबाद राहिला. (वृत्तसंस्था)
Web Title: India 'A' defeated Australia 'A'
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.