इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स यानं त्याच्या आत्मचरित्रात इंग्लंड संघाच्या वन डे वर्ल्ड कप विजयासंदर्भात लिहिले आहे. या स्पर्धेत यजमान इंग्लंडसमोर करो वा मरो सामन्यात टीम इंडियाचे आव्हान होते. याच सामन्यातील निकालावर पाकिस्तानचेही स्पर्धेतील भवितव्य अवलंबून होते. पण, इंग्लंडने हा सामना जिंकला आणि उपांत्य फेरीतील आव्हान कायम राखले. त्यानंतर इंग्लंडने इतिहास रचला. पण, या सामन्यात टीम इंडियाच्या महेंद्रसिंग धोनीकडून जिंकण्यासाठी प्रयत्न न झाल्याचा दावा स्टोक्सने त्याच्या पुस्तकात केला होता. त्यानंतर पाकिस्तानी खेळाडूंनी आरोपांचे सत्र सुरू केले.
बाबो: असा षटकार मारूनच दाखवा; 75 लाख वेळा पाहिला गेला अतरंगी व्हिडीओ!
जुलै महिन्यात 'ही' टीम करणार इंग्लंड दौरा; जाणून घ्या कधी व कुठे खेळणार
पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू सिकंदर बख्तनं सिकंदरने ट्विट करून लिहिले की,''वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ मुद्दाम इंग्लंडकडून पराभूत झाला, असं बेन स्टोक्सनं त्याच्या पुस्तकात लिहिले आहे. पाकिस्तानला स्पर्धेबाहेर करण्यासाठी भारतानं ही खेळी केली. याची भविष्यवाणी मी आधीच केली होती.'' यावर बेन स्टोक्सनं रिट्विट करून लिहिले की,''असं लिहिलेलं तुम्हाला शोधून सापडणार नाही. मी असं कधी बोललोच नाही. याला शब्दांसोबत खेळणे असे म्हणातात.''
पण, आता पाकिस्तानचा माजी गोलंदाज अब्दुल रझ्झाकनेही यात उडी मारली आहे. तो म्हणाला,''भारतीय संघ मुद्दाम हरला, यात काहीच शंका नाही. मी हे त्याही वेळेस म्हटले होते. धोनीसारखा फलंदाज मैदानावर असूनही चौकार-षटकार मारत नव्हता.''
मोहम्मद शमीच्या पत्नीचा Bold अंदाज; नेटिझन्स म्हणाले...
जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये रॉजर फेडरर अव्वल; टॉप 100 मध्ये एकच भारतीय!
कोणताच क्रिकेट सामना प्रामाणिकपणे खेळला जात नाही, सर्व फिक्स असतात; बुकी संजीव चावलाची कबुली
युवराज सिंगचं मुंबईतील घर लय भारी; विराट कोहलीच्या घरापेक्षा डबल महाग!
बोंबला; क्रिकेट संघाच्या निवड समितीतील सदस्याला कोरोनाची लागण