कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी भारत-पाकिस्तान क्रिकेट मालिका खेळवण्याचा प्रस्ताव पाक गोलंदाज शोएब अख्तरनं ठेवला होता. तीन वन डे सामन्यांच्या मालिकेतून उभा राहणाऱ्या निधीचं दोन्ही देशांतील कोरोना परिस्थिशी मुकाबल्यासाठी समान वाटप केलं जाईल, असा प्रस्ताव अख्तरनं ठेवला होता. पण, भारतीय संघाचे माजी कर्णधार कपिल देव यांनी अख्तरच्या प्रस्तावाचा चांगलाच समाचार घेतला.
अख्तर म्हणाला होता की,''हा संकटाचा काळ आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये तीन सामन्यांच्या मालिकेचा प्रस्ताव मला ठेवायचा आहे. पण, या सामन्यातून दोन्ही देशांतील चाहते एकमेकांच्या पाठिशी उभे राहतील. विराटनं शतक झळकावलं तर आम्ही आनंद साजरा करू, तसेच बाबरनं शतक झळकावल्यास तुम्ही आनंद साजरा करा. मैदानावरील निकालापेक्षा दोन्ही सघ विजयी ठरतील. या सामन्याला मोठी व्ह्यूअर्सशीप मिळेल. इतिहासात प्रथमच दोन्ही संघ एकमेकांसाठी खेळतील. यातून उभा राहणारा निधी दोन्ही देशांना समान दिला जाईल.''
कपिल देव यांनी यावरून अख्तरला फटकारलं. ते म्हणाले,''भारताला पैशांची गरज नाही. त्यामुळे अशी मालिका खेळवायला नको आणि क्रिकेटपटूंचं जीव कशाला धोक्यात घालायचा? त्यामुळे निवांत राहा आणि घरीच थांबा. एकाचाही जीव धोक्यात घालायचं संकट का ओढावून घ्यायचे? त्यामुळे अशा सल्ल्याची गरज नाही. प्रशासन योग्य काम करत आहे.''
अन्य महत्त्वाच्या बातम्या
इशांत शर्माची पत्नी भडकली; काँग्रेस नेत्याला सुनावले खडेबोल, केले ब्लॉक!
भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील...
युवराज, हरभजनच्या मदतीला 'रावळपिंडी एक्स्प्रेस'; टीकाकारांवर हल्लाबोल
भारतीय खेळाडूंच्या 'जर्सी क्रमांका'मागची मजेशीर गोष्ट...
Corona Virus : ... तर भारताचे हे उपकार पाकिस्तान कधीच विसरणार नाही, शोएब अख्तर
अमित मिश्रा, मिताली राज यांचा गरजूंसाठी पुढाकार; करतायत अन्नदान