Join us  

भारत विजयासाठी उत्सुक, टीम इंडिया जर-तरचा ससेमिरा टाळण्यास प्रयत्नशील

भारतीय संघ टी-२० तिरंगी मालिकेत बुधवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणा-या लढतीत विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे. अंतिमफेरी गाठण्यासाठी जर-तरचा ससेमिरा टाळण्यास टीम इंडिया प्रयत्नशील आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 4:39 AM

Open in App

कोलंबो : भारतीय संघ टी-२० तिरंगी मालिकेत बुधवारी बांगलादेशविरुद्ध खेळल्या जाणा-या लढतीत विजयाच्या निर्धाराने उतरणार आहे. अंतिमफेरी गाठण्यासाठी जर-तरचा ससेमिरा टाळण्यास टीम इंडिया प्रयत्नशील आहे. पहिल्या लढतीत श्रीलंकेविरुद्ध पत्कराव्या लागलेल्या पराभवानंतर भारतीय अखेरच्या साखळी सामन्यात बांगलादेशविरुद्धच्या लढतीत प्रयोग करणार नाही. श्रीलंकेविरुद्ध विक्रमी २१५ धावांच्या लक्ष्याचा यशस्वी पाठलाग केल्यामुळे बांगलादेशचे मनोधैर्य उंचावलेले आहे. आता भारताचा पराभव करीत अंतिम फेरीतील प्रवेशाची दावेदारी अधिक मजबूत करण्यास श्रीलंका संघ उत्सुक आहे. भारताला या लढतीत पराभव स्वीकारावा लागला तरी अंतिम फेरी गाठण्याची संधी राहील, पण त्यासाठी बांगलादेश व श्रीलंका यांच्यादरम्यान खेळल्या जाणाºया लढतीच्या निकालावर अवलंबून राहावे लागेल. अशा स्थितीत नेटरनरेटला महत्त्व प्राप्त होईल.गेल्या दोन सामन्यांत सलग विजय मिळवणाºया भारतीय संघाचा नेटरनरेट ०.२१ असा आहे. भारतासाठी ही स्पर्धा म्हणजे अनुभवी खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडूंना संधी देण्याचा पर्याय होता, पण भारतीय क्रिकेट चाहत्यांची अपेक्षा बघता संघव्यवस्थापनाला अधिक प्रयोग करण्याची संधी नाही. अशा स्थितीत दीपक हुड्डा, मोहम्मद सिराज, अक्षर पटेल यांच्यासारख्या खेळाडूंना दौºयावर पाठविण्यास अधिक अर्थ राहणार नाही. त्यांना अद्याप एकही लढत खेळण्याची संधी मिळालेली नाही. (वृत्तसंस्था)>भुवी व बुमराहच्या अनुपस्थितीत शार्दूल जबाबदारी स्वीकारण्यास सज्जमर्यादित षटकांच्या लढतींमध्ये सहज संधी मिळणार नाही, याची शार्दूल ठाकूरला चांगली कल्पना आहे. त्यामुळे भुवनेश्वर कुमार व जसप्रीत बुमराह यांच्या अनुपस्थितीत तिसºया वेगवान गोलंदाजाची भूमिका निभावण्यासाठी तो सज्ज आहे. ठाकूरच्या (४ बळी) अचूक माºयाच्या जोरावर सोमवारी भारताने यजमान श्रीलंकेचा सहा गडी राखून पराभव केला. ठाकूर म्हणाला, ‘मला आव्हान स्वीकारणे आवडते. संघात अन्य सीनिअर गोलंदाज नसताना मला अतिरिक्त प्रयत्न करावे लागतील. मी यापूर्वी रणजी ट्रॉफी स्पर्धेत मुंबईतर्फे झहीर खान, धवल कुलकर्णी व अजित आगरकर यांच्या स्थानी खेळलेलो आहे. भुवनेश्वरसह अनेक भारतीय गोलंदाज ‘नेकल बॉल’ (स्लोअर वन चेंडूचा प्रकार) प्रयोग करतात. याचा सर्वप्रथम वापर झहीरने करण्यास सुरुवात केली, पण मी ही कला स्वत: आत्मसात केली असल्याचे ठाकूर म्हणाला. ठाकूर म्हणाला, ‘झहीरने याची सुरुवात केली, पण मी त्याचे अधिक व्हीडीओ बघितले नाही. चेंडूवर पकड कशी असावी, याची मला कल्पना होती. मी ही कला स्वत: आत्मसात केली.’>रोहित शर्माचा फॉर्म संघासाठी सर्वांत मोठी चिंता आहे. रोहितला एका मोठ्या खेळीची प्रतीक्षा आहे. सुरेश रैनाला चांगल्या सुरुवातीचे मोठ्या खेळीमध्ये रुपांतर करावे लागेल.प्रतिस्पर्धी संघभारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा, वाशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दूल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, ऋषभ पंत.बांगलादेश : महमुदुल्लाह (कर्णधार), तमिम इक्बाल, सौम्या सरकार, इमरुल कायेस, मुशफिकुर रहीम, शब्बीर रहमान, मुस्तफिजूर रहमान, रुबेल हुसेन, तस्किन अहमद, अबू हैदर, अबू जायेद, आरिफुल हक, नजमुल इस्लाम, नुरुल हसन, मेहदी हसन, लिटन दास.