ICC Women T20 World Cup 2024 । नवी दिल्ली : 2024 चा महिला ट्वेंटी-20 विश्वचषक पुढील वर्षी बांगलादेशमध्ये होणार आहे. या मोठ्या स्पर्धेसाठी आठ संघ थेट पात्र ठरले आहेत. तर, श्रीलंका आणि आयर्लंड 2024 च्या ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषकासाठी थेट पात्र ठरू शकले नाहीत. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) मंगळवारी माहिती दिली की, बांगलादेशमध्ये होणाऱ्या ICC महिला ट्वेंटी-20 विश्वचषक 2024 साठी आठ संघांनी थेट पात्रता मिळवली आहे. पात्रता प्रक्रियेनुसार, प्रत्येक गटातील अव्वल तीन संघ यजमानांसह थेट पात्र ठरतील.
वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत भारताची थेट एन्ट्री ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघ लीग टप्प्यातील गट 1 मधील शीर्ष तीन संघ म्हणून थेट पात्र ठरले आहेत. तर इंग्लंड, भारत आणि वेस्ट इंडिज यांनी गट 2 मधून प्रवेश मिळवला आहे. बांगलादेशने स्पर्धेच्या नवव्या आवृत्तीचे यजमानपद सांभाळत पात्रता फेरीत प्रवेश मिळवला आहे, तर पाकिस्तानने 27 फेब्रुवारी 2023 पर्यंत ICC महिला ट्वेंटी संघ क्रमवारीत पुढील सर्वोच्च क्रमवारीत स्थान मिळवले. उर्वरित दोन स्पॉट पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या जागतिक पात्रता फेरीतून निश्चित केले जाणार आहेत. या वर्षीच्या स्पर्धेत खेळणाऱ्या संघांपैकी श्रीलंका आणि आयर्लंड हे एकमेव संघ आहेत जे थेट पात्र ठरू शकले नाहीत. श्रीलंका सध्या क्रमवारीत आठव्या स्थानावर आहे, तर आयर्लंड दहाव्या स्थानावर आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"