लंडन : ऐतिहासिक लाॅर्ड्स स्टेडियमवर २०२६मध्ये भारत-इंग्लंड यांच्यात पहिला महिला कसोटी सामना रंगणार आहे, अशी घोषणा इंग्लंड अँड वेल्स क्रिकेट बोर्डाने (ईसीबी) गुरुवारी केली. या मैदानावर पहिल्यांदाच दोन्ही महिला संघांतील कसोटी सामना होणार आहे. ईसीबीने आपल्या संकेतस्थळावर सांगितले की, जुलै २०२५मध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका होणार आहे. त्यानंतर भारतीय संघ २०२६मध्ये एका कसोटीसाठी पुन्हा इंग्लंडला येणार आहे.
ईसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रिचर्ड गोल्ड यांनी सांगितले की, भारतीय महिला संघ २०२६मध्ये लाॅर्ड्स येथे पहिल्या महिला कसोटी सामन्यात इंग्लंडच्या महिला संघाचा सामना करण्यासाठी येईल. दोन्ही संघांसाठी ही मोठी संधी असेल. भारतीय संघ २०२६मध्ये लाॅर्ड्समध्ये एकमेव कसोटी सामना खेळेल.
इंग्लंडच्या महिला संघाने मागील तीन वर्षांपासून लाॅर्ड्सवर पांढऱ्या चेंडूवरील सामने खेळले आहेत. पुढील वर्षी आणखी एक सामना होणार आहे. पण, महिलांच्या कसोटी सामन्यात भारताचे यजमानपद भूषवण्याची ही या मैदानाची पहिलीच वेळ असेल.
भारतीय संघाने मागील वर्षी डिसेंबरमध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध आणि यावर्षी जुलैमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या कसोटी सामन्यांत विजय मिळवला होता. भारताने इंग्लंडविरुद्ध मागील कसोटी सामना २०२१मध्ये ब्रिस्टल येथे खेळला होता. हा सामना ड्राॅ झाला होता.
भारत-इंग्लंड महिला क्रिकेट संघाचे वेळापत्रकटी-२० मालिका सामना स्थान तारीखपहिला नाॅटिंगहॅम २८ जून २०२५दुसरा ब्रिस्टल १ जुलै २०२५तिसरा द ओव्हल ४ जुलै २०२५चौथा मँचेस्टर ९ जुलै २०२५पाचवा बर्मिंगहॅम १२ जुलै २०२५
वनडे मालिकासामना ठिकाण तारीखपहिला साउदम्पटन १६ जुलै २०२५दुसरा लाॅर्ड्स १९ जुलै २०२५तिसरा चेस्टर ली स्ट्रीट २२ जुलै २०२५