India, Pakistan, IND vs WI ODI Series: 'हिटमॅन'च्या टीम इंडियाने केला विश्वविक्रम! कट्टर प्रतिस्पर्धा पाकिस्तानच्या कामगिरीशी केली बरोबरी

भारताने वेस्ट इंडिजला धूळ चारत पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 10, 2022 01:02 PM2022-02-10T13:02:24+5:302022-02-10T13:11:45+5:30

whatsapp join usJoin us
India equals World Record of Pakistan while beating west indies in ODI Series under Rohit Sharma Captaincy | India, Pakistan, IND vs WI ODI Series: 'हिटमॅन'च्या टीम इंडियाने केला विश्वविक्रम! कट्टर प्रतिस्पर्धा पाकिस्तानच्या कामगिरीशी केली बरोबरी

India, Pakistan, IND vs WI ODI Series: 'हिटमॅन'च्या टीम इंडियाने केला विश्वविक्रम! कट्टर प्रतिस्पर्धा पाकिस्तानच्या कामगिरीशी केली बरोबरी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India, Pakistan, IND vs WI ODI Series: सूर्यकुमार यादवने केलेली अर्धशतकी खेळी आणि प्रसिध कृष्णाचे १२ धावांमध्ये ४ बळी याच्या जोरावर भारतीय संघाने वेस्ट इंडिजला पराभूत केले. भारतीय संघाने मायदेशात वेस्ट इंडिजला सलग दुसऱ्या वन डे सामन्यात ४४ धावांनी पराभूत करत तीन सामन्यांची मालिका २-० अशी खिशात घातली. नवा पूर्णवेळ कर्णधार रोहित शर्मा याच्या नेतृत्वाखाली भारताने पहिलीच वन डे मालिका जिंकली. या मालिकाविजयाबरोबरच भारताने पाकिस्तानच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.   

भारतीय संघाने वेस्ट इंडिजला घरच्या मैदानावर सलग सातव्यांदा आणि एकूण अकराव्यांदा पराभूत करत मालिका जिंकली. ही मालिका जिंकण्यासोबतच टीम इंडियाने द्विपक्षीय मालिकेत (Bilateral Series) सर्वाधिक ११ वेळा वन डे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाला पराभूत करण्याचा पराक्रम केला. त्यासोबतच भारताने विश्वविक्रमाची बरोबरी केली. यापूर्वी हा विक्रम केवळ पाकिस्तान क्रिकेट संघाच्या नावे होता. त्यांनी झिम्बाब्वेला सलग ११ मालिकांमध्ये पराभूत केले होते. पण आता भारताने पाकिस्तानच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली.

मालिका जिंकणं खूप आनंददायी!

"मालिका जिंकणं ही नक्कीच आनंदाची बाब आहे. आम्ही जेव्हा फलंदाजीस उतरलो तेव्हा सामन्यात आव्हानात्मक परिस्थिती होती. सूर्यकुमार आणि लोकेश राहुल यांच्यातील भागीदारी आमच्यासाठी महत्त्वाची ठरली. जेव्हा तुमचे अनुभवी फलंदाजी चांगली कामगिरी करतात तेव्हा तुम्हाला सामन्याचा निकाल सकारात्मकच मिळतो", असं रोहित मालिका विजयाबाबत बोलला.

Web Title: India equals World Record of Pakistan while beating west indies in ODI Series under Rohit Sharma Captaincy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.