India vs West Indies: युवा खेळाडूंच्या क्षमतेची चाचणी; भारताचा आज तिसरा टी-२० सामना

विंडीज व्हाईटवॉश टाळण्यास प्रयत्नशील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2019 02:19 AM2019-08-06T02:19:17+5:302019-08-06T06:50:31+5:30

whatsapp join usJoin us
India eye 3 0 whitewash against West Indies in t20 series | India vs West Indies: युवा खेळाडूंच्या क्षमतेची चाचणी; भारताचा आज तिसरा टी-२० सामना

India vs West Indies: युवा खेळाडूंच्या क्षमतेची चाचणी; भारताचा आज तिसरा टी-२० सामना

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

गयाना : मालिकेत विजयी आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला मंगळवारी येथे खेळल्या जाणाऱ्या तिसºया व अखेरच्या टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात युवा खेळाडूंची चाचणी घेण्याची संधी आहे, तर वेस्ट इंडिज संघ व्हाईटवॉश टाळण्यासाठी प्रयत्नशील राहील.
अमेरिकेत खेळल्या गेलेल्या दोन सामन्यात भारताने मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली आहे. शनिवारी चार गडी राखून विजय मिळवल्यानंतर भारताने रविवारी दुसºया सामन्यात डकवर्थ-लुईस नियमाच्या आधारावर २२ धावांनी सरशी साधली.

पहिल्या लढतीत भारतीय संघाला विशेष प्रभावी कामगिरी करता आली नाही, पण दुसºया सामन्यात विराट कोहली अँड कपंनीने वर्चस्व गाजवले. विजांचा कडकडाट व त्यानंतर झालेल्या पावसामुळे निकालाची कोंडी फोडण्यासाठी डकवर्थ- लुईस नियमाचा आधार घ्यावा लागला.

भारतीय संघ फलंदाजी क्रमामध्ये विशेष बदल करणार नाही, पण गोलंदाजीमध्ये नवे समीकरण वापरण्याची शक्यता आहे. रविवारी विजयानंतर प्रतिक्रिया देताना कर्णधार कोहली म्हणाला, ‘मालिका जिंकल्यामुळे आम्हाला काही खेळाडूंची चाचणी घेण्याची संधी मिळेल. सर्वप्रथम विजयाचा प्रयत्न असतो, पण पहिले दोन सामने जिंकल्यानंतर आम्हाला प्रयोग करण्याची संधी मिळते.’

मधल्या फळीत संघर्ष करीत असलेल्या रिषभ पंतच्या स्थानी अंतिम ११ खेळाडूंमध्ये लोकेश राहुलला संधी मिळाली तर आश्चर्य वाटणार नाही. पंतने पहिल्या दोन सामन्यात अनुक्रमे शून्य व चार असा स्कोअर नोंदवला. कर्णधार कोहलीने पंतची पाठराखण केली आहे. त्यामुळे या २१ वर्षीय खेळाडूला पुन्हा संधी मिळते का, याबाबत उत्सुकता आहे.

रोहित शर्मा व शिखर धवन या सलामीच्या जोडीला विश्रांती मिळण्याची शक्यता नाही. अंगठ्याच्या फ्रॅक्चरमुळे विश्वकप स्पर्धेतून काही सामन्यानंतर मायदेशी परतणाऱ्या शिखरला पहिल्या दोन सामन्यात मोठी खेळी करता आली नाही. तो वन-डे व कसोटी सामन्यांपूर्वी धावा फटकावण्यास उत्सुक आहे. युवा वेगवान गोलंदाज नवदीप सैनीच्या स्थानी लेग स्पिनर राहुल चहरला संधी मिळू शकते.

राहुलचा चुलत भाऊ दीपक चहर यालाही अंतिम ११ खेळाडूंमध्ये संधी मिळू शकते. त्यासाठी रवींद्र जडेजाला विश्रांती मिळू शकते. टी-२० क्रिकेटमध्ये बलाढ्य मानल्या जाणाºया वेस्ट इंडिज संघाला या मालिकेत अद्याप सांघिक कामगिरी करता आलेली नाही. किरोन पोलार्ड व कर्णधार कार्लोस ब्रेथवेट यांच्याकडून संघाला मोठ्या खेळीची आशा आहे. वेस्ट इंडिज संघाने मंगळवारच्या लढतीत विजय मिळविला तर वन-डे व कसोटी मालिकेपूर्वी त्यांचे मनोधैर्य उंचावण्यास मदत मिळेल.

सैनीला डीमेरिट गुण : भारताचा जलदगती गोलंदाज नवदीप सैनी याला आयसीसीने एक डीमेरिट गुण दिला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात वेस्ट इंडिजच्या निकोलस पुरन याला बाद केल्यावर सैनीने त्याच्याकडे पाहून ‘आक्रमक इशारा’ केला होता.

सैनीने खेळाडूंसाठीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केले. सैनीवर मैदानी पंच नायजेल डुगुईड, ग्रेगरी ब्रेथवेट, तिसरे पंच लेस्ली रिफर आणि गस्टर्ड यांनी आरोप केले होते. सैनी याने चूक मान्य केली. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही. सामनाधिकारी जेफ क्रो यांनी दिलेली ही शिक्षा नवदीप सैनी याने मान्य देखील केली आहे.

प्रतिस्पर्धी संघ
भारत : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, श्रेयस अय्यर, मनीष पांडे, रिषभ पंत, कृणाल पांड्या, रवींद्र जडेजा, वाशिंग्टन सुंदर, राहुल चहर, भुवनेश्वर कुमार, खलील अहमद, दीपक चाहर व नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज : जॉन कॅम्पबेल, एव्हिन लुईस, शिमरोन हेटमायर, निकोलस पूरण, किरोन पोलार्ड, रोवमॅन पॉवेल, कार्लोस ब्रेथवेट (कर्णधार), किमो पॉल, सुनील नरेन, शेल्डन कोटरेल, ओशेन थॉमस, अँथोनी ब्रेमबल, जेसन मोहम्मद व खेरी पियरे.

Web Title: India eye 3 0 whitewash against West Indies in t20 series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.