भारतापेक्षा पाकिस्तान सुरक्षित; पाक क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा

पाकिस्तान संघानं घरच्या मैदानावर दहा वर्षांनी झालेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2019 03:38 PM2019-12-23T15:38:40+5:302019-12-23T15:39:00+5:30

whatsapp join usJoin us
‘India a far greater security risk than Pakistan’: PCB chief Ehsan Mani | भारतापेक्षा पाकिस्तान सुरक्षित; पाक क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा

भारतापेक्षा पाकिस्तान सुरक्षित; पाक क्रिकेट मंडळाच्या अध्यक्षांचा अजब दावा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पाकिस्तान संघानं घरच्या मैदानावर दहा वर्षांनी झालेल्या कसोटी मालिकेत विजय मिळवला. श्रीलंकेविरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत यजमानांनी वर्चस्व गाजवला. पाकिस्ताननं दुसरा सामना 263 धावांनी जिंकला. या विजयासह पाकिस्ताननं दोन सामन्यांची मालिका 1-0 अशी खिशात घातली. या मालिकेनंतर पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष एहसान मणी यांनी एक धक्कादायक विधान केलं. पाकिस्तान हा भारतापेक्षा सुरक्षित असल्याचा दावा त्यांनी केला.

पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यात रावळपिंडी स्टेडियमवरील पहिला कसोटी सामना अनिर्णीत राहिला. कराची येथे दुसरा कसोटी सामना सुरू आहे. पाकिस्तानचा पहिला डाव 191 धावांत गुंडाळून श्रीलंकेनं 271 धावा केल्या. पण, पाकिस्ताननं दुसऱ्या डावात दमदार खेळी केली. शान मसूद आणि अबीद अली यांनी शतकी खेळी केली, परंतु अबीदचे शतक पराक्रमी ठरले. मसूद आणि अबीद यांच्यानंतर कर्णधार अझर अली आणि बाबर आझम यांनीही शतक झळकावलं. त्यांच्या या खेळीच्या जोरावर पाकिस्ताननं 3 बाद 555 धावांवर दुसरा डाव घोषित केला.

मसूदने 198 चेंडूंत 7 चौकार व 3 षटकारांसह 135 धावा केल्या. अबीदनं 281 चेंडूंत 21 चौकार व 1 षटकार खेचून 174 धावा, अझर अलीनं 157 चेंडूंत 13 चौकारांसह 118 धावा आणि बाबरनं 131 चेंडूंत 7 चौकार व 1 षटकारासह नाबाद 100 धावा केल्या. त्यांनी  श्रीलंकेसमोर 476 धावांचे आव्हान ठेवले. लक्ष्याचा पाठलाग करताना श्रीलंकेचा दुसरा डाव 212 धावांत गडगडला. श्रीलंकेकडून ओशादा फर्नांडोनं 180 चेंडूंत 13 चौकारांसह 102 धावांची खेळी केली. त्याला  निरोशान डिकवेलानं 65 धावा करताना साथ दिली, परंतु या दोघांचे प्रयत्न अपूरे पडले. पाकिस्तानच्या नसीम शाहन 31 धावा देत 5 विकेट्स घेतल्या.

ते म्हणाले,''श्रीलंकेविरुद्धची मालिका यशस्वीरित्या पार पाडून आम्ही पाकिस्तान किती सुरक्षित आहे, हे सिद्ध केले. पाकिस्तानात कोणी खेळण्यास नकार देत असेल तर त्यांनी देश असुरक्षित असल्याचा पुरावा द्यावा. सुरक्षिततेच्या बाबतित पाकिस्तान हा भारताच्या आघाडीवर आहे. भारतात असुरक्षितता अधिक आहे.'' 

बांगलादेश पाकिस्तान दौरा करणार
पुढील वर्षी तीन ट्वेंटी-20 आणि दोन कसोटी सामन्यांसाठी बांगलादेशचा संघ पाकिस्तान दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. ''आम्ही बांगलादेश क्रिकेट मंडळाशी चर्चा करत आहोत. केवळ बांगलादेशच नव्हे अन्य संघांशीची चर्चा सुरू आहे,'' असे मणी यांनी सांगितले. 

Web Title: ‘India a far greater security risk than Pakistan’: PCB chief Ehsan Mani

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.