भारताने दिला ‘क्लीन स्वीप’

भारताने श्रीलंकेचा तिसºया व अखेरच्या कसोटीत सोमवारी तिसºया दिवशी एक डाव १७१ धावांनी पराभव करीत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 15, 2017 01:21 AM2017-08-15T01:21:54+5:302017-08-15T01:22:03+5:30

whatsapp join usJoin us
India gives clean sweep | भारताने दिला ‘क्लीन स्वीप’

भारताने दिला ‘क्लीन स्वीप’

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

पल्लीकल : रविचंद्रन आश्विन व मोहम्मद शमी यांच्या अचूक माºयाच्या जोरावर भारताने श्रीलंकेचा तिसºया व अखेरच्या कसोटीत सोमवारी तिसºया दिवशी एक डाव १७१ धावांनी पराभव करीत तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत ३-० ने क्लीन स्वीप केला.
पहिला डाव १३५ धावांत संपुष्टात आल्यामुळे फॉलोआॅनची नामुष्की ओढवलेल्या श्रीलंका संघाचा दुसरा डाव ७४.३ षटकांत १८१ धावांत संपुष्टात आला. आश्विन (४-६८) व शमी (३-३२) यांना उमेश यादव (२-२१) व कुलदीप यादव (१-५६) यांची योग्य साथ लाभली. भारताने पहिल्या डावात ४८७ धावांची मजल मारली होती.
श्रीलंकेच्या एकाही फलंदाजाला खेळपट्टीवर टिकाव धरता आला नाही. त्यांच्यातर्फे यष्टिरक्षक फलंदाज निरोशन डिकवेला याने सर्वाधिक ४१ धावा केल्या, तर कर्णधार दिनेश चंडीमलने ३६ व अँजेलो मॅथ्यूजने ३५ धावांची खेळी केली. भारताने गालेमध्ये पहिल्या कसोटी सामन्यात ३०४ धावांनी, तर कोलंबोमध्ये दुसºया कसोटी सामन्यात एक डाव ५३ धावांनी विजय मिळवला होता.
श्रीलंकेने कालच्या १ बाद १९ धावसंख्येवरून आज पुढे खेळण्यास सुरुवात केली. सकाळच्या सत्रात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने भेदक मारा करताना दोन बळी घेतले, तर आश्विनने एका फलंदाजाला तंबूचा मार्ग दाखविला. आश्विनने दिवसाच्या तिसºया षटकात सलामीवीर दिमुथ करुणारत्नेला (१६) बाद केले. शमीने डावाच्या २१ व्या षटकात नाईट वॉचमन मलिंडा पुष्पकुमाराला (१), तर त्यानंतरच्या षटकात कुसाल मेंडिसला (१२) बाद केले. सकाळच्या सत्रात यजमान संघाने सुरुवातीला १३ धावांत ३ फलंदाजांना गमावले. त्यानंतर चंडीमल व मॅथ्यूज यांनी डाव सावरला. डावाच्या ३५ व्या षटकात उमेशच्या गोलंदाजीवर मॅथ्यूजविरुद्ध झेलचितचे जोरदार अपील झाले, पण मैदानावरील पंचांनी ते फेटाळले. भारताने डीआरएसचा आधार घेतला, पण तिसºया पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय उचलून धरला.
उपाहारानंतर चंडीमल व मॅथ्यूज यांनी बचावात्मक पवित्रा कायम ठेवला. मॅथ्यूजने कुलदीपच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला, पण या चायनामन गोलंदाजाने पुढच्याच षटकात चंडीमलला शॉर्टलेगवर पुजाराकडे झेल देण्यास भाग पाडले. चंडीमलने ८९ चेंडूंना सामोरे जाताना ४ चौकार लगावले. त्यानंतर आश्विनने मॅथ्यूजला पायचित करीत श्रीलंकेला सहावा धक्का दिला. मॅथ्यूजने डीआरएसचा निर्णय घेतला, पण तिसºया पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय कायम ठेवला. आश्विनच्या त्यानंतरच्या षटकात पंचांनी दिलरुवान परेराला स्लिपमध्ये झेलचित असल्याचा निर्णय दिला, पण फलंदाजाने डीआरएसचा अवलंब केल्यानंतर तिसºया पंचांनी मैदानावरील पंचांचा निर्णय बदलला. त्याने २३ चेंडूंमध्ये ८ धावा काढून तो बाद झाला. त्याला आश्विनने माघारी परतवले. डिकवेला व लक्षण संदाकन (८) यांनी ९ षटके भारतीय गोलंदाजांना यश मिळू दिले नाही. डिकवेलाने आश्विन, शमी व उमेश यांच्या गोलंदाजीवरही चौकार मारले. संदाकनने शमीच्या गोलंदाजीवर दुसरा चौकार ठोकला, पण पुढच्याच चेंडूवर यष्टिरक्षक साहाकडे झेल देत माघारी परतला. डिकवेलाचा अडथळा उमेशने दूर केला. त्याने ५२ चेंडूंमध्ये पाच चौकार लगावले. आश्विनने त्यानंतर लाहिरू कुमाराला (१०) क्लीन बोल्ड करीत भारताच्या विजयाची औपचारिकता पूर्ण केली. (वृत्तसंस्था)
>कारकिर्दीतील सर्वांत निराशाजनक मालिका : चंडीमल
माझ्या कारकिर्दीतील ही सर्वांत निराशाजनक मालिका ठरली असून पराभवासाठी कुठलीही सबब देता येणार नाही, अशी प्रतिक्रिया श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडीलमने व्यक्त केली. भारताविरुद्धच्या मालिकेत ३-० ने पराभव स्वीकारावा लागल्यानंतर तो पत्रकार परिषदेत बोलत होता. चंडीमल म्हणाला, ‘‘माझ्या कारकिर्दीतील ही सर्वांत खडतर मालिका ठरली, यात कुठली शंका नाही. याचे कारण आम्हाला लढत पाच दिवसांपर्यंत लांबविता आली नाही. चार किंवा तीन दिवसांमध्येच आम्हाला पराभव स्वीकारावा लागला. वैयक्तिक व संघासाठी ही मालिका निराशाजनक ठरली.
भारताने विदेशात प्रथमच तीन किंवा त्यापेक्षा अधिक कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्वीप केला आहे. यापूर्वी भारताने विदेशात केवळ एकदा १९६७-६८ च्या मोसमात न्यूझीलंंडविरुद्ध मालिकेत तीन कसोटी सामने जिंकण्याचा पराक्रम केला होता. त्या वेळी मन्सूरअलीखान पतौडी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने चार सामन्यांच्या मालिकेत ३-१ ने विजय मिळवला होता.
>‘जगातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये
मोहम्मद शमीचा समावेश’
शमीच्या कारकिर्दीला दुखापतींचे ग्रहण लागलेले आहे. जर त्याने यापासून मार्ग काढला तर सातत्याने चांगली कामगिरी करू शकतो. भविष्यात तो दुखापतग्रस्त होऊ नये, अशी आशा आहे.’’
भारतीय कर्णधार विराट कोहलीने सोमवारी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीची प्रशंसा केली. जगातील अव्वल तीन वेगवान गोलंदाजांमध्ये शमी असल्याचे विराटने म्हटले आहे.
शमीने तीन कसोटी सामन्यांत चमकदार कामगिरी करताना १७.७० च्या सरासरीने १० बळी घेतले. विराट म्हणाला, ‘‘मी जगातील ३ वेगवान गोलंदाजांमध्ये शमीला स्थान देईन.
प्रभावी मारा करण्यात वाकबगार असलेल्या शमीमध्ये बळी घेण्याची क्षमता आहे. तो नियमित १४५ किलोमीटर प्रतितास वेगाने मारा करू शकतो व प्रतिस्पर्धी फलंदाजांना अडचणीत आणू शकतो.
>विदेशी धरतीवर ७८ व्या मालिकेत रचला इतिहास
विदेशी धरतीवर ७८ व्या मालिकेतील हा भारताचा १८ वा मालिका विजय आहे. यादरम्यान पहिल्यांदाच भारताने ३-0 ने व्हाइटवॉश दिला आहे. १९३२ सालापासून भारताने कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात सीके नायडू यांनी कर्णधारपद सांभाळलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत ३३ जणांनी भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भुषवलं आहे, पण केवळ कोहलीलाच हा पराक्रम करता आला.
विदेशात भारताने आतापर्यंत केवळ बांगलादेश व झिम्बाब्वे यांच्याविरुद्ध अशी कामगिरी केली आहे. पण, या मालिकांत केवळ १ किंवा २ सामने मर्यादित होते. भारताने २००० मध्ये बांगलादेशाचा एका कसोटी सामन्याच्या मालिकेत १-0 ने, तर २00४ व २0१0 मध्ये २ कसोटींच्या मालिकेत २-0 ने पराभव केला होता.
नंबर गेम
पहिल्यांदाच भारतीय संघाने विदेशी भूमीवर तीन किंवा त्यापेक्षा मालिकेत व्हाईटवॉश केला. एकूणच, भारतीय संघाने तीन पेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत पाचव्यांदा व्हाईटवॉश केला.
दोन वेळा श्रीलंकेला घरच्या मैदानावर दोन किंवा त्यापेक्षा अधिक सामन्यांच्या मालिकेत व्हाईटवॉशचा सामना करावा लागला. यापूर्वी २००४-०४ मध्ये आॅस्ट्रेलियाने श्रीलंकेचा व्हाईटवॉश केला होता. एकूणच, त्यांना सहाव्यांदा व्हाईटवॉशचा सामना करावा लागला.
3५.९८
ही या मालिकेतील भारतीय फलंदाजी आणि गोलंदाजीची सरासरी होती. जी इतर मालिकेतील तीन पेक्षा अधिक कसोटीतील सर्वाधिक दुसरी सर्वाेच्च आहे. यापूर्वी, १९८६ मध्ये श्रीलंकेविरुद्ध ४४.४३ असा फरक गोलंदाजी आणि फलंदाजी या सरासरीतील होता. या मालिकेत भारतीय फलंदाजीची सरासरी ही ६०.९० आणि गोलंदाजी सरासरी ही २४.९२ अशी आहे.
रा सर्वात मोठा कसोटी विजय ठरला. एक डाव आणि १७१ धावांनी विजय हा विदेशी भूमीवरील तिसरा मोठा विजय.
भारतीय फलंदाजांनी या मालिकेत शतके झळकाविली. त्यात शिखर धवन, चेतेश्वर पूजारा, अजिंक्य रहाणे आणि हार्दीक पांड्या यांचा समावेश आहे. विदेशात सांघिकरित्या अशी कामगिरी पहिल्यांदाच झाली. दहाही खेळाडूंनी ५० पेक्षा अधिक धावसंख्या केली. जी कसोटीतील सांघिकरित्या सर्वाेच्च दुसरी आहे.
>टीम इंडिया वर्ल्ड रेकॉर्डपासून एक पाऊल दूर
भारतीय टीम सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड रचण्यापासून केवळ एक पाऊल दूर आहे. सलग मालिका विजयाचा वर्ल्ड रेकॉर्ड आॅस्ट्रेलिया संघाच्या नावे आहे. त्यांनी सलग ९ मालिका विजय मिळवले होते. यापूर्वी भारताने २००८ आणि २०१० च्या दौ-यात अनिल कुंबळे, महेंद्रसिंग धोनी आणि विरेंद्र सेहवाग या तीन वेगवेगळ्या कर्णधारांच्या नेतृत्वाखाली ५ सलग विजय मिळवले होते.
>धावफलक :
भारत पहिला डाव : ४८७. श्रीलंका पहिला डाव : १३५.
श्रीलंका दुसरा डाव : दिमुथ करुणारत्ने झे. रहाणे गो. आश्विन १६, उपुल थरंगा त्रि. गो. उमेश ०७, मलिंडा पुष्पकुमारा झे. साहा गो. शमी ०१, कुसाल मेंडिस पायचित गो. शमी १२, दिनेश चंडीमल झे. पुजारा गो. कुलदीप ३६, अँजेलो मॅथ्यूज पायचित गो. आश्विन ३५, निरोशन डिकवेला झे. रहाणे गो. उमेश ४१, दिलरुवान परेरा झे. पांड्या गो. आश्विन ०८, लक्षण संदाकन झे. साहा गो. शमी ०८, विश्व फर्नांडो नाबाद ०४, लाहिरू कुमारा त्रि. गो. आश्विन १०. अवांतर : ३. एकूण : ७४.३ षटकांत सर्व बाद १८१. बाद क्रम : १-१५, २-२६, ३-३४, ४-३९, ५-१०४, ६-११८, ७-१३८, ८-१६६, ९-१६८, १०-१८१. गोलंदाजी : शमी १५-६-३२-३, आश्विन २८.३-६-६८-४, उमेश १३-५-२१-२, कुलदीप १७-४-५६-१, पांड्या १-०-२-०.

Web Title: India gives clean sweep

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.