Join us

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये या 5 संघांकडून एकदाही हरलेला नाही भारत! असा आहे पाकिस्तानसोबतचा रेकॉर्ड

Champions Trophy: भारताने आतापर्यंत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली एकदा आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली एकदा, अशी एकूण दोन वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 19:40 IST

Open in App

Champions Trophy: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ ला अवघ्या काही तासांत सुरुवात होणार आहे. या स्पर्धेला ८ वर्षांनंतर पुन्हा सुरुवात होत आहे. यावेळी, या स्पर्धेचे आयोजन पाकिस्तान करत आहे. १९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना ९ मार्च रोजी खेळवला जाईल. भारताने आतापर्यंत सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखाली एकदा आणि महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली एकदा, अशी एकूण दोन वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील आताच्या भारतीय संघाकडेही विजयाचा दावेदार म्हणून बघितले जात आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीचा हा नववा हंगाम असणार आहे. आतापर्यंत केवळ भारत आणि ऑस्ट्रेलियानेच २-२ वेळा ही ट्रॉफी जिंकली आहे. २०२२ मध्ये श्रीलंकेने या स्पर्धेचे आयोजन केले होते. तेव्हा पावसामुळे अंतिम सामना होऊ शकला नाही आणि भारत-श्रीलंका या दोघांनाही संयुक्त विजेते घोषित करण्यात आले. २०१३ च्या हंगामात, महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली, भारताने अंतिम सामन्यात इंग्लंडला हरवून ट्रॉफी जिंकली होती.

भारतीय संघाला हे 5 संघ कधीच हरवू शकले नाही - भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये सर्वाधिक २९ सामने खेळले आहेत, यांपैकी १८ सामने जिंकले आहेत, ८ गमावले आहेत तर ३ अनिर्णित राहिले आहेत. तर, इंग्लंडने २५ सामने खेळले आहेत आणि १४ सामने जिंकले आहेत. मात्र या स्पर्धेच्या इतिहासात ५ संघ असे आहेत, जे भारतीय संघाचा कधीही पराभव करू शकलेले नाहीत. यांत दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, बांगलादेश, झिम्बाब्वे आणि केनियाचा समावेश होतो. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळताना भारताने या संघांविरुद्ध कधीही पराभवाचे तोंड पाहिलेले नाही.

भारत-पाकिस्तानचा रेकॉर्ड -जर चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तानसंदर्भात बोलायचे झाल्यास, या स्पर्धेत आतापर्यंत दोन्ही संघांमध्ये एकूण ५ सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने केवळ २ सामने जिंकले आहेत. तर पाकिस्तानच्या पारड्यात ३ विजय आहेत. यांत गेल्या वेळी झालेल्या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचाही समावेश आहे. पाकिस्तानने भारताला हरवूनच चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. 

टॅग्स :चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५भारतीय क्रिकेट संघपाकिस्तानद. आफ्रिका