अयाझ मेमन, संपादकीय सल्लागार
भारताच्या इंग्लंड दौऱ्याला आज सुरुवात होत आहे. पहिला सामना आयर्लंडविरोधात आहे. या संघाला नुकतेच कसोटीत स्थान मिळाले आहे. मात्र हा सामना टी-२० सामना आहे. आधी मर्यादित षटकांचे सामने होतील. नंतर कसोटी सामने होतील. मला वाटते या प्रकारे वेळापत्रक बनवण्यामागे विचार चांगला आहे. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून लक्ष पूर्णपणे कसोटी क्रिकेटमध्ये वळते. तसेच खेळाडूंनादेखील इंग्लंडच्या वातावरणात रुळायला वेळ मिळतो.
टी-२० मध्ये भारतीय संघ तिसºया क्रमांकावर आहे. त्यामुळे संघाला आपले रँकिंग सुधारण्याची ही संधी आहे. आयर्लंडविरोधातील दोन्ही सामने आणि नंतरचे इंग्लंड विरोधातील सामने जिंकून भारतीय संघ पहिल्या क्रमांकावर पोहचू शकतो. आयर्लंडचा संघ कमकुवत मानला जातो. त्यांच्याकडे फारसा अनुभव नाही. मात्र जेवढी षटके कमी होतात, तेवढाच खेळ बदलतो. त्यामुळे अफगाणिस्तान आणि आयर्लंडसारखे संघ इतर बलाढ्य संघांना पराभूत करू शकतात. वेस्ट इंडिजचा संघ कसोटीत आठव्या क्रमांकावर आहे आणि ते सध्या टी-२० मध्ये विश्वविजेते आहेत. त्यातूनच समोर येते की, कसोटी आणि टी- २० मध्ये किती अंतर आहे.
भारताच्या संघाने आयर्लंडला कमी लेखू नये. त्यांच्याकडे गमावण्यासारखे काहीच नाही. पराभूत झाले तर काहीच नाही. आणि जिंकले तर मात्र त्यांना खूप काही मिळेल. त्यामुळे विराट कोहली आणि इतर खेळाडूंना जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागेल.
Web Title: India has the opportunity to improve rankings
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.