श्रीनगर : घरच्या परिस्थितीचा लाभ घेत यंदा भारतीय पुरुष क्रिकेट संघाकडे आयसीसी एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धा जिंकण्याची मोठी संधी आहे, असे भारतीय महिला क्रिकेट संघाची माजी कर्णधार मिताली राज हिने म्हटले आहे. भारतात ५ ऑक्टोबरपासून विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होत आहे. भारतीय संघ १९८३ आणि २०११ नंतर तिसऱ्यांदा जगज्जेतेपद जिंकण्याच्या इराद्याने मैदानावर उतरणार आहे.
महिला प्रीमिअर लीगच्या फायनलसाठी येथे आलेली मिताली म्हणाली की, भारतीय क्रिकेटची चाहती म्हणून मला वाटते की भारताने अंतिम फेरीपर्यंत पोहोचावे. आपण यजमान असल्यामुळे आपल्याला मोठी संधी आहे. कारण आपल्या देशातील परिस्थिती आपल्याला माहिती आहे. संघाने चांगली कामगिरी केली तर भारताकडे विश्वचषक जिंकण्याची संधी आहे.
सर्व खेळाडूंनी लौकिकाला साजेशी कामगिरी केली तर भारताला विश्वचषक जिंकण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही, असेही ती म्हणाली. महिला एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक ७८०५ धावा करणारी मिताली म्हणाली की, पर्वतीय भागांत क्रिकेटच्या विकासाला गती मिळत आहे. बीसीसीआय महिलांच्या खेळाला आणि महिला खेळाडूंना प्रोत्साहन देत आहे.
Web Title: India have a chance to win the World Cup - Mithali Raj
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.