IND vs BAN : दुष्काळात तेरावा महिना! बांगलादेशने टीम इंडियाची जीरवली अन् आता रोहित अँड टीमच्या खिशाला कात्री

India vs Bangladesh 1st ODI :  भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2022 04:31 PM2022-12-05T16:31:40+5:302022-12-05T16:32:23+5:30

whatsapp join usJoin us
India have been fined 80 per cent of their match fee for maintaining a slow over-rate against Bangladesh in the first ODI in Mirpur on Sunday | IND vs BAN : दुष्काळात तेरावा महिना! बांगलादेशने टीम इंडियाची जीरवली अन् आता रोहित अँड टीमच्या खिशाला कात्री

IND vs BAN : दुष्काळात तेरावा महिना! बांगलादेशने टीम इंडियाची जीरवली अन् आता रोहित अँड टीमच्या खिशाला कात्री

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India vs Bangladesh 1st ODI :  भारतीय संघाला पहिल्या वन डे सामन्यात धक्कादायक पराभव पत्करावा लागला.१८६ धावांचा पाठलाग करताना बांगलादेशची अवस्था ९ बाद १३६ धावा अशी झाली होती. आता सामना भारताचाच असे वाटले होते, परंतु मेहिदी हसनने (  Mehidy Hasan) अखेरच्या विकेटसोबत खिंड लढवली. मेहिदी व मुश्ताफिजूर यांनी दहाव्या विकेटसाठी वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम भागीदारी करताना बांगलादेशला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. बांगलादेशने १ विकेट राखून सामना जिंकला. 
शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan) भारतीय फलंदाजांना नाक घासायला भाग पाडले. शाकिबची ( ५-३६) कामगिरी ही भारताविरूद्ध वन डे क्रिकेटमधील डावखुऱ्या फिरकीपटूची सर्वोत्तम कामगिरी ठरली.

इबादत होसैनने चार विकेट्स घेतल्या आणि भारताचा डाव १८६ धावांवर गुंडाळला.  भारताकडून लोकेश राहुलने ७० चेंडूंत ५ चौकार व ४ षटकारांसह ७३ धावा केल्या. प्रत्युत्तरात लिटन दास ( ४१) वगळता आघाडीच्या फलंदाजांनी माना टाकल्या. ९ बाद १३६ धावांवरून बांगलादेशचे पुनरागमन अशक्यच होते, परंतु मेहिदी हसन ( ३८*) आणि मुस्ताफिजूर रहमना  (१०*) यांनी ५१ धावांची विक्रमी भागीदारी केली.  
भारतीय संघाची ८० टक्के मॅच फी कापली...

पहिल्या वन डे सामन्यात भारताने षटकांचा वेग संथ राखला आणि निर्धारीत वेळेत षटकं पूर्ण न केल्यामुळे आयसीसीने त्यांच्यावर कारवाई केली. आयसीसीच्या मॅच रेफरीच्या एलिट पॅनलमधील रंजन मदुगाले यांनी या निर्णय घेतला. निर्धारित वेळेपेक्षा भारतीय संघ ४ षटकं मागे असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले आणि आर्टिकल २.२२ नुसार भारताला ८० टक्के मॅच फी दंड म्हणून भरावी लागणार आहे.  

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: India have been fined 80 per cent of their match fee for maintaining a slow over-rate against Bangladesh in the first ODI in Mirpur on Sunday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.