IND vs SA : रोहितने टॉस जिंकला! आज टेबल टॉपर्समध्ये लढाई; भारत 'आठ'वावा प्रताप करणार?

ICC ODI World Cup 2023 : आज वन डे विश्वचषकात भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना होत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 5, 2023 01:36 PM2023-11-05T13:36:27+5:302023-11-05T13:36:36+5:30

whatsapp join usJoin us
India have won the toss and Rohit Sharma has elected to bat first for the IND vs SA match in ICC ODI World Cup 2023  | IND vs SA : रोहितने टॉस जिंकला! आज टेबल टॉपर्समध्ये लढाई; भारत 'आठ'वावा प्रताप करणार?

IND vs SA : रोहितने टॉस जिंकला! आज टेबल टॉपर्समध्ये लढाई; भारत 'आठ'वावा प्रताप करणार?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

IND vs SA Live Match Updates | कोलकाता : आज भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात कोलकाता येथील ईडन गार्डन्स स्टेडियमवर सामना होत आहे. दोन्हीही संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी असल्याने आज टेबल टॉपर्स यांच्यात लढत होत आहे. भारताने सलग सात सामने जिंकून आपला दबदबा निर्माण केला आहे, तर दक्षिण आफ्रिकेने केवळ नेदलॅंड्सविरूद्धचा सामना वगळता भल्याभल्यांना चीतपट केले आहे. त्यामुळे आजचा सामना दोन्हीही संघासाठी अग्निपरीक्षा असेल. आजच्या सामन्यासाठी भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. 

 आजच्या सामन्यासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह.

आजच्या सामन्यासाठी दक्षिण आफ्रिकेचा संघ -
टेम्बा बावुमा (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रॅसी व्हॅन डर ड्युसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, हेनरिक क्लासेन, मार्को जॅनसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, लुंगी एनगिडी, तबरेझ शम्सी.

दरम्यान, भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सामना पाच क्रमांकाच्या खेळपट्टीवर खेळला जात आहे. याच खेळपट्टीवर बांगलादेश आणि नेदरलँड्स यांच्यातील सामना खेळला गेला, जो कमी धावसंख्येचा होता. या सामन्यात २३० धावांचा पाठलाग करताना बांगलादेशचा संघ १४२ धावांत सर्वबाद झाला आणि नेदरलँडसने ८७ धावांनी सामना आपल्या नावावर केला. 
 

Web Title: India have won the toss and Rohit Sharma has elected to bat first for the IND vs SA match in ICC ODI World Cup 2023 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.