Join us  

टीम इंडिया इंग्लंडची कॉपी करणार! विराट, रोहित आदी सीनियर्सना बाहेर बसवून मोठा निर्णय घेणार  

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर BCCI ने हालचाली सुरू केल्या आणि ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 10:58 AM

Open in App

इंग्लंडच्या क्रिकेटमध्ये सध्या क्रांतिकारक बदल पाहायला मिळतोय... इयॉन मॉर्गनच्या नेतृत्वाखाली वन डे वर्ल्ड कप जिंकणाऱ्या इंग्लंडने नुकताच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला आणि आता बेन स्टोक्सच्या नेतृत्वात पाकिस्तानमध्ये कसोटी मालिका गाजवत आहे. पण, तेच क्रिकेटची महासत्ता असलेल्या भारतीय संघाचा डाऊन फॉल सुरू आहे. सलग दोन ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये भारताला अपयश आले, आशिया चषकाच्या फायनलपर्यंतही ते पोहोचू शकले नाही. त्यात आता बांगलादेशने वन डे मालिकेत पाणी पाजले. भारतीय संघाच्या या निराशाजनक कामगिरीची BCCI ने गंभीर दखल घेतली आहे आणि आता त्यांच्याकडून ठोस पाऊलं उचलली जाण्याची तयारी सुरू झाली आहे.

रिषभ पंत आला, पण BCCI ने नवा उप कर्णधार निवडला; ओपनिंगला उतरणार नवी जोडी

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर BCCI ने हालचाली सुरू केल्या आणि ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवले. आयर्लंड दौऱ्यावर हार्दिकने नेतृत्व केले आणि त्याचवेळी विराट कोहली, रोहित शर्मा आदी सीनियर्सना आता ट्वेंटी-२० विसरा असा मेसेज दिला गेला. २०२४ मध्ये होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कपची तयारी म्हणून बीसीसीआय आता ट्वेंटी-२० संघात नव्या दमाच्या खेळाडूंना अधिक संधी देणार आहे. त्याचवेळी २०२३मध्ये भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपची तयारीही सुरू झाली आहे आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा आहेच.

३ जानेवारी ते १ फेब्रुवारी २०२३ या कालवाधीत भारतीय संघ १२ मर्यादित षटकांचे सामने खेळणार आहेत. त्यात न्यूझीलंड आणि श्रीलंका यांच्याविरुद्धच्या प्रत्येकी ६ सामन्यांचा समावेश आहे. भारतीय संघ सहा वन डे व ६ ट्वेंटी-२० सामन्यांसाठी १२ वेगवेगळ्या शहरांमध्ये १२वेळा विमानाने प्रवास करणार आहे. अशात खेळाडूंवरील वर्क लोड कमी करण्यासाठी BCCI आता इंग्लंड क्रिकेट बोर्डाची कॉपी करणार आहे. इंग्लंडने तीनही फॉरमॅटसाठी काही खेळाडू वगळता तीन वेगवेगळेच संघ निवडले आहेत. आता भारतही वन डे व ट्वेंटी-२० साठी वेगळे  संघ निवडण्याच्या तयारीत आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्ध चार कसोटी व तीन वन डे सामन्यांची मालिका होणार आहे

भारत-श्रीलंका मालिका

  • पहिली ट्वेंटी-२० - ३ जानेवारी, मुंबई
  • दुसरी ट्वेंटी-२० - ५ जानेवारी, पुणे
  • तिसरी ट्वेंटी-२० - ७ जानेवारी, राजकोट

 

  • पहिली वन डे - १० जानेवारी, गुवाहाटी
  • दुसरी वन डे - १२ जानेवारी, कोलकाता
  • तिसरी वन डे - १५ जानेवारी, तिरुअनंतपुरम  

 भारत-न्यूझीलंड 

  • पहिली वन डे - १८ जानेवारी, हैदराबाद 
  • दुसरी वन डे - २१ जानेवारी, रायपूर
  • तिसरी वन डे - २४ जानेवारी, इंदूर

 

  • पहिली ट्वेंटी-२० - २७ जानेवारी, रांची
  • दुसरी ट्वेंटी-२० - २९ जानेवारी, लखनौ
  • तिसरी ट्वेंटी-२० - १ फेब्रुवारी, अहमदाबाद  

 

भारत दौऱ्यावर येणारा ऑस्ट्रेलियाचा संघ ९ ते १३ फेब्रुवारी ( नागपूर), १७ ते २१ फेब्रुवारी ( दिल्ली), १ ते ५ मार्च ( धर्माशाला) आणि ९ ते १३ मार्च ( अहमदाबाद ) असे चार कसोटी सामने खेळणार आहे. त्यानंतर १७ मार्च ( मुंबई), १९ मार्च ( विझाग) आणि २२ मार्च ( चेन्नई) असे तीन वन डे सामने होतील. 

 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :बीसीसीआयभारतीय क्रिकेट संघरोहित शर्माभारत विरुद्ध श्रीलंका
Open in App