भारतीय क्रिकेट संघाने अफगाणिस्तानविरुद्धच्या तिसऱ्या टी-२० सामन्यात दणदणीत विजय नोंदवला. या विजयासह भारताने मालिकाही ३-०ने जिंकली. भारतीय संघाला आता इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका खेळायची असून त्यासाठीचा संघही जाहीर करण्यात आला आहे. इंग्लंडविरुद्धचे सर्व सामने भारतातच खेळवले जातील. २०२२मध्ये या दोन संघांमध्ये शेवटची मालिका झाली होती. त्यानंतर भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला.
भारताला जानेवारी-मार्चदरम्यान इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. पहिली कसोटी २५ जानेवारीपासून हैदराबादमध्ये, दुसरी कसोटी २ फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये, तिसरी कसोटी १५ फेब्रुवारीपासून राजकोटमध्ये, चौथी कसोटी २३ फेब्रुवारीपासून रांचीमध्ये आणि पाचवी कसोटी ७ मार्चपासून धर्मशाला येथे खेळवली जाईल. शेवटच्या मालिकेत म्हणजेच २०२२मध्ये ५ दोघांमध्ये ५ सामन्यांची कसोटी मालिका झाली होती. ही मालिका २-२ अशा बरोबरीत संपली होती.
संघातील एक अनकॅप्ड खेळाडू
टीम इंडियातून बाहेर असलेल्या इशान किशनच्या अनुपस्थितीत अनकॅप्ड ध्रुव जुरेलचा संघात समावेश करण्यात आला आहे. केएल राहुल आणि केएस भरत हे १६ सदस्यीय संघात इतर दोन यष्टीरक्षक आहेत. चार वर्षांपूर्वी आयसीसी अंडर-१९ पुरुष क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचलेल्या १९ वर्षांखालील संघाचा ज्युरेल उपकर्णधार आहे.
पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघ:रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, एस अय्यर, केएल राहुल (विकेटकीपर), केएस भरत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), आर अश्विन, आर. जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), आवेश खान.