श्रीलंकेविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली. भारताने जरी मालिका जिंकली असली, तरी त्यांना पहिल्या सामन्यातील पराभवातून एक धडा शिकायला मिळाला. वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर भारताचा पराभव झाला होता. त्यामुळे फलंदाजांनी आपल्या तंत्रावर अधिक मेहनत न केल्यास आगामी दक्षिण आफ्रिका दौºयामध्ये भारताला अडचणींचा सामना करावा लागेल. उर्वरित दोन सामन्यांमध्ये भारताचे वर्चस्व स्पष्ट दिसून येते.मालिका जिंकल्याचा आनंद नक्कीच आहे, पण पहिल्या सामन्यातून मिळालेल्या पराभवातून शिकण्याचीही खूप आवश्यकता आहे. यावर भारतीय संघाने किती काम केले याची कल्पना नाही, पण प्रशिक्षक रवी शास्त्री व कर्णधार विराट कोहली यांनी नेहमीच अशी परिस्थिती संघाला मिळावी, यासाठी आग्रह धरला होता. पण जो काही निकाल आला, त्यावर संघव्यवस्थापन नक्कीच खूश नसेल.भारतीय खेळाडूंच्या प्रदर्शनाचे कौतुक करावे लागले. सर्वप्रथम म्हणजे रोहित शर्मा, त्याने तिसरे एकदिवसीय द्विशतक ठोकताना स्वत:ची गुणवत्ता सिद्ध केली. आता, रोहित या गुणवत्तेचा वापर कसोटी क्रिकेटमध्ये कसा करतो, हे पाहावे लागेल. कारण, आफ्रिकेमध्ये सहा फलंदाज खेळणार हे जवळपास निश्चित असताना रोहितची जागा पक्की असणार. त्यामुळेच आता परदेशात धावा काढण्याचे आव्हान त्याच्यापुढे असेल. शिखर धवनने जेव्हापासून पुनरागमन केले आहे, तेव्हापासून तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. एक शतक ठोकून त्याने आपली क्षमता दाखवली आहे.यावर्षी दुखापतीतून पुनरागमन केल्यानंतर त्याने सातत्यपूर्णकामगिरी करताना आपला फॉर्म कायम भक्कम ठेवला. त्यातही भारतीय फिरकी गोलंदाजांची कामगिरी सर्वात जास्त आवडली. कुलदीप यादव व यजुवेंद्र चहल यांनी विशेषकरून अखेरच्या सामन्यात लंकेच्या फलंदाजीला खिंडारपाडले. दुर्दैवाने आफ्रिका दौºयासाठी केवळ दोन फिरकी गोलंदाज निवडले गेले आहेत, नाही तर दोघांपैकी एकाची वर्णी नक्कीच लागली असती. शिवाय त्यांच्यात कसोटी सामना खेळण्याची क्षमताही आहे. त्याचप्रमाणे भुवनेश्वर कुमारने लग्नामुळे काही सामने खेळले नाहीत, तर जसप्रीत बुमराहने मालिकेत सामन्यातही चांगली कामगिरी केली.युवा खेळाडू श्रेयस अय्यरने दोन अर्धशतके झळकावली. मुंबईचा मुख्य फलंदाज असलेला श्रेयस रणजी स्पर्धेत कायम संघासाठी निर्णायक भूमिका बजावतो. त्यानेही आपली गुणवत्ता या मालिकेत सिद्ध केली. तो एक तंत्रशुद्ध फलंदाज आहे. पण याआधीच्या सामन्यात त्याने रोहितला चांगली साथ दिल्यानंतर अखेरच्या सामन्यात चांगला जम बसल्यानंतर आपली विकेट अक्षरश: फेकली. त्यामुळे अय्यरने धवन, रोहित किंवा विशेषकरून कोहलीकडून शिकले पाहिजे. फॉर्ममध्ये असल्याचा पूर्णपणे फायदा कसा करून घ्यावा, हे यांच्याकडून त्याने शिकावे. अय्यरकडे शतक झळकावण्याची चांगली संधी होती. शतकाचे महत्त्व प्रत्येक फलंदाज जाणून असतो. हेच अय्यरने लवकरात लवकर शिकावे.संघात जागा मिळवण्यासाठी सध्या खूप मोठी स्पर्धा आहे.त्यामुळे, १-२ सामन्यांत अपयशी ठरल्यास लगेच तुम्ही तुमची जागा गमावू शकता. अशीच गोष्ट सध्या अजिंक्य रहाणेसोबत झाली आहे. त्यामुळे अय्यरसाठी हा मोठा धडा राहील.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताने एक धडा शिकला : अयाझ मेमन
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत भारताने एक धडा शिकला : अयाझ मेमन
श्रीलंकेविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली. भारताने जरी मालिका जिंकली असली, तरी त्यांना पहिल्या सामन्यातील पराभवातून एक धडा शिकायला मिळाला. वेगवान गोलंदाजीला पोषक खेळपट्टीवर भारताचा पराभव झाला होता.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 19, 2017 12:50 AM