कोलंबो : सलग तीन सामने जिंकणारा भारतीय संघ आणि आक्रमक मूडमध्ये असलेला बांगलादेश यांच्यात निदहास टी-२० तिरंगी मालिकेचा अंतिम सामना आज रविवारी रंगणार आहे. रोमहर्षक मानल्या जाणाऱ्या या लढतीत भारताची नजर असेल ती जेतेपदावर.भारताने या स्पर्धेत दुय्यम दर्जाचा संघ उतरविला. त्यातच श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना गमवावा लागला. त्यानंतर भारताने विजयाची हॅट्ट्रिक साजरी केली तर बांगलादेशने यजमान संघावर नाट्यमय विजय नोंदवित अंतिम फेरीत धडक दिली. अखेरच्या क्षणी सामन्याला वादाचे गालबोटदेखील लागले होते.भारतीय संघ आॅस्ट्रेलिया किंवा पाकिस्तान यांच्याविरुद्ध जिकरीने खेळतो. बांगलादेशविरुद्ध भारताची तशी स्पर्धा दिसत नाही. तथापि मेलबोर्न येथे २०१५च्या विश्वचषकाच्या उपांत्यपूर्व सामन्यानंतर हा समज बदलला. त्या सामन्यात पंचांचे काही निर्णय आमच्या विरोधात गेले नसते तर भारताला धूळ चारणे शक्य होते, असे बांगलादेशला अद्याप वाटते. त्या सामन्यापासून बांगलादेश संघ भारताला सर्वांत मोठा प्रतिस्पर्धी समजू लागला आहे.त्या सामन्यात रोहित शर्माच्या कमरेच्यावर टाकलेला चेंडू ‘नोबॉल’ मानून पंचाने त्याला नाबाद ठरविले होते. बांगलादेश संघ आणि त्यांचे चाहते, तो प्रसंग कधीही विसरू शकणार नाहीत. हा आपला अपमान होता, असा त्यांचा समज आहे. त्याचवर्षी भारताने बांगलादेशात वन-डे मालिका गमाविली. यजमान संघाने ‘बदला’ घेतल्याच्या भावनेतून बांगला देशात भारतीय खेळाडूंचे फोटो सर्वत्र झळकविण्यात आले होते. अनुभव-कौशल्य यांची तुलना केल्यास भारतीय खेळाडू बांगलादेशच्या तुलनेत अनेक पटींनी पुढे आहेत. रोहित-धवन यांची सलामी जोडी तमीम इक्बाल- लिट्टन दास यांच्या तुलनेत बरीच पुढे आहे. मैदानावर खेळणाºया २२ खेळाडूंपैकी सुरेश रैना हा झटपट क्रिकेटमधील सर्वाधिक अनुभवी आहे. दिनेश कार्तिकविरुद्ध मुशफिकूर रहीम अशी तुलना केली तरी भारतीय यष्टिरक्षक कार्तिक हा दडपणात सरस खेळू शकतो. मनीष पांडेला आयपीएलचा दांडगा अनुभव आहे. (वृत्तसंस्था)उभय संघ यातून निवडणारभारत : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, सुरेश रैना, दिनेश कार्तिक, मनीष पांडे, जयदेव उनादकट, युजवेंद्र चहल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, ऋषभ पंत, वाश्ािंग्टन सुंदर, लोकेश राहुल, अक्षर पटेल, दीपक हुड्डा आणि मोहम्मद सिराज.बांगला देश : शाकिब अल हसन (कर्णधार), मुशफिकर रहीम,तमीम इक्बाल, महमुदुल्लाह, रुबेल हुसेन, शब्बीर रहमान, सौम्या सरकार, नाजमुल इस्लाम, लिट्टन दास, तस्कीन अहमद, मुस्तफिजूर रहमान,मेहंदी हसन, इमरुल कायेस, अरीफूल हक, नुरूल हसन, अबू हैदर रोनी आणि अबू झायद.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारताची नजर जेतेपदावर, बांगलादेशला अंतिम सामन्यात धूळ चारण्यास सज्ज
भारताची नजर जेतेपदावर, बांगलादेशला अंतिम सामन्यात धूळ चारण्यास सज्ज
सलग तीन सामने जिंकणारा भारतीय संघ आणि आक्रमक मूडमध्ये असलेला बांगलादेश यांच्यात निदहास टी-२० तिरंगी मालिकेचा अंतिम सामना आज रविवारी रंगणार आहे. रोमहर्षक मानल्या जाणाऱ्या या लढतीत भारताची नजर असेल ती जेतेपदावर.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 2:14 AM