केपटाऊन : मधल्या फळीला आकार देत दमदार खेळी करणारा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या (९३) धावांच्या बळावर भारताने द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत दुस-या दिवशी पहिल्या डावात २०९ धावांपर्यंत मजल गाठली. यजमान आफ्रिकेने २८६ धावा केल्याने भारत ७७ धावांनी माघारला. हार्दिक ‘नर्व्हस नार्इंटीज’चा बळी ठरला. शतकापासून तो सात धावांनी वंचित राहिला.दुसºया दिवशी खेळ संपला तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या २ बाद ६५ धावा झाल्या होत्या. भारताच्या हार्दिक पंड्याने दक्षिण आफ्रिकेच्या मार्कराम (३४) आणि एल्गर (२८) यांना बाद केले.त्याआधी, हार्दिकच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने चहापानापर्यंत सात गड्यांच्या मोबदल्यात १८५ धावा फळ्यावर लावल्या होत्या. पंड्याने स्वत:ची निवड सार्थकी लावली. सातव्या स्थानावर फलंदाजीला आलेल्या हार्दिकने ९५ चेंडूंत १४ चौकार आणि एका षटकारासह ९३ धावांचे योगदान दिले. हार्दिकने एबी डिव्हिलियर्सच्या खेळीला चोख उत्तर दिले. त्याला १५ आणि ७१ धावांवर असताना दोनदा जीवदान मिळाले. त्यानंतरही त्याने उसळी घेणाºया चेंडूवर फटके मारलेच.भारताने पहिल्या २५ षटकांत केवळ ४८ धावा केल्या होत्या. यादरम्यान रोहित शर्माचा (११ धावा) बळी दिला. रबाडाने रोहितला पायचित केले. दुसºया सत्रात आफ्रिकेने वर्चस्व गाजविले. भारताने या सत्रात १०९ धावा काढल्या, तर आफ्रिकेने तीन गडी बाद केले.भारताने सकाळी शुक्रवारच्यातीन बाद २८ धावांवरून खेळ सुरू केला. पुजारा- रोहित यांनी प्रतिकार करीत आफ्रिकेच्या गोलंदाजांना त्रस्त केले. दोघांनीही बाहेर जाणाºया चेंडूंना स्पर्श करायचा नाही, असेधोरण अवलंबले होते. धावा काढण्यापेक्षा विकेट वाचविण्यास दोघांनी प्राधान्य दिले.रबाडा गोलंदाजीला आला तोच डावाला कलाटणी मिळाली. त्याने वेगवान, उसळी घेणारे आणि हवेत फिरणारे चेंडू टाकले. रोहित हे चेंडू खेळताना कमालीचा चाचपडत होता. अखेर २९ व्या षटकात तोे पायचित झाला. त्याने डीआरएसचा आश्रय घेतला, पण निर्णय त्याच्याविरोधात गेला. (वृत्तसंस्था)धावफलकदक्षिण आफ्रिका : पहिला डाव २८६.भारत पहिला डाव :- मुरली विजय झे. एल्गर गो. फिलँडर ०१, शिखर धवन झे. व गो. स्टेन १६, चेतेश्वर पुजारा झे. ड्यू प्लेसिस गो. फिलँडर २६, विराट कोहली झे. डिकॉक गो. मोर्कल ०५, रोहित शर्मा पायचित गो. रबाडा ११, रविचंद्रन आश्विन झे. डिकॉक गो. फिलँडर १२, हार्दिक पंड्या झे. डिकॉक गो. रबाडा ९३, वृद्धिमान साहा पायचित गो. स्टेन ००, भुवनेश्वर कुमार झे. डिकॉक गो. मोर्कल २५, मोहम्मद शमी नाबाद ०४, जसप्रीत बुमराह झे. एल्गर गो. रबाडा ०२. अवांतर (१४). एकूण : ७३.४ षटकांत सर्व बाद २०९. बाद क्रम : १-१६, २-१८, ३-२७, ४-५७, ५-७६, ६-८१, ७-९२, ८-१९१, ९-१९९, १०-२०९. गोलंदाजी : फिलँडर १४.३-८-३३-३, स्टेन १७.३-६-५१-२, मोर्कल १९-६-५७-२, रबाडा १६.४-४-३४-३, महाराज ६-०-२०-०.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- भारत १४२ धावांनी माघारला; हार्दिक पंड्याची अष्टपैलू चमक, द. आफ्रिका दुसरा डाव २ बाद ६५ धावा
भारत १४२ धावांनी माघारला; हार्दिक पंड्याची अष्टपैलू चमक, द. आफ्रिका दुसरा डाव २ बाद ६५ धावा
मधल्या फळीला आकार देत दमदार खेळी करणारा अष्टपैलू हार्दिक पंड्याच्या (९३) धावांच्या बळावर भारताने द. आफ्रिकेविरुद्ध पहिल्या कसोटीत दुस-या दिवशी पहिल्या डावात २०९ धावांपर्यंत मजल गाठली. यजमान आफ्रिकेने २८६ धावा केल्याने भारत ७७ धावांनी माघारला. हार्दिक ‘नर्व्हस नार्इंटीज’चा बळी ठरला. शतकापासून तो सात धावांनी वंचित राहिला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2018 3:39 AM