पहिला कसोटी सामना गमावला असला तरी भारताला अद्याप संधी

पहिला कसोटी सामना गमावला असला तरी भारताला अद्याप मालिका विजयाची संधी आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते, पण भारतीय संघाने दोन वर्षापूर्वी श्रीलंकेत अशी कामगिरी केलेली असून पुन्हा अशी कामगिरी करण्यास सक्षम आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2018 12:53 AM2018-01-13T00:53:34+5:302018-01-13T00:53:41+5:30

whatsapp join usJoin us
India lost the first Test, though India still have a chance | पहिला कसोटी सामना गमावला असला तरी भारताला अद्याप संधी

पहिला कसोटी सामना गमावला असला तरी भारताला अद्याप संधी

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

- सुनील गावसकर लिहितात...

पहिला कसोटी सामना गमावला असला तरी भारताला अद्याप मालिका विजयाची संधी आहे. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत पहिला सामना गमावल्यानंतर पुनरागमन करणे सोपे नसते, पण भारतीय संघाने दोन वर्षापूर्वी श्रीलंकेत अशी कामगिरी केलेली असून पुन्हा अशी कामगिरी करण्यास सक्षम आहे. दक्षिण आफ्रिकेचा दक्षिण आफ्रिकेत पराभवाचे स्वप्न साकार करण्यासाठी फलंदाजांना आता कंबर कसावी लागेल. पहिल्या कसोटी सामन्यात कचखाऊ फलंदाजीमुळेच भारताला पराभव स्वीकारावा लागला. खेळपट्टी फलंदाजीसाठी अनुकूल नसली तरी येथे फलंदाजी करणे अशक्य नक्कीच नव्हते. भारतीय फलंदाजांच्या देहबोलीचे अवलोकन त्यांच्या पायाच्या हालचालीवरून दिसून आले. ते थकलेले दिसले. स्विंग माºयापुढे ते हतबल झालेले दिसले. दोन्ही डावात स्विंग होणाºया चेंडूंचा पाठलाग करताना बाद झाल्याचे निदर्शनास आले. दुसºया कसोटीत भारतीय फलंदाजांनी मरगळ झटकून खेळपट्टीवर ठामपणे उभे राहण्याचा आत्मविश्वास दाखवायला हवा.
भारतीय संघाचा थिंग टँक काहीही विचार करत असो, पण टीम इंडियाने सराव सामने खेळायला हवे होते. त्याचे कारण असे की भारतीय संघ उपखंडाबाहेर पहिल्या कसोटी सामन्यात संघर्ष करीत असल्याचा इतिहास आहे. एक-दोन सराव सामने खेळले असते तर पहिल्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान माºयाला सामोरा जाताना अनोळखीपण जाणवले नसते. त्याचप्रमाणे भारतीय संघाने सराव सत्रात साडेसहा फूट उंचीच्या गोलंदाजाचा समावेश करायला हवा. त्यामुळे मोर्ने मोर्कलचे चेंडू कसे खेळता येईल, याची त्यांना कल्पना येईल. तयारी अपेक्षेप्रमाणे नव्हती, असे खेदाने म्हणावे लागेल. ऐच्छिक सरावासाठी खेळाडूंनी स्वत: नाही तर केवळ कर्णधार व प्रशिक्षकांनी कुठल्या खेळाडूला विश्रांती द्यायची याचा निर्णय घ्यायला हवा. पर्याय दिला तर अनेक खेळाडूंनी सराव न करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला आणि कसोटी संपल्यानंतरच्या दिवशी त्याची प्रचिती आली.
मी एक कुटुंबवत्सल माणूस आहे. कार्यालयात काम करणारे कर्मचारीही सायंकाळ झाली म्हणजे आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवितात मग खेळाडूंनी का नाही ? पण, कसोटी सामन्यासाठी सराव म्हणजे कार्यालयीन वेळ आणि मोठ्या दिवसाची तयारी असते. हे मात्र घडताना दिसत नाही. कसोटी सामन्याच्या पाचव्या दिवशी आयोजित ऐच्छिक सराव सत्रात राखीव सहापैकी केवळ चार खेळाडू सहभागी होणे निराशाजनक होते. पावसाच्या व्यत्ययामुळे तिसºया दिवसाचा खेळ झाला नाही. त्यामुळे थकव्याचा प्रश्नच नव्हता. वेगवान गोलंदाजांव्यतिरिक्त सर्वांनी सराव सत्रात सहभागी व्हायला हवे होते. कसोटी सामना संपल्याबरोबर लगेल मैदानावरील कर्मचाºयांना सरावासाठी येत असल्यामुळे खेळपट्टीवर पाणी न टाकण्याची सूचना द्यायला हवी
होती. ज्या खेळपट्टीवर फलंदाजी करताना अडचण भासली त्याच खेळपट्टीवर सराव करायला हवा होता. त्यानंतरचा दिवस प्रवासाचा होता. त्यामुळे थोडा सराव किंवा नो प्रॅक्टिस असा दिवस असायला हवा होता. ज्यावेळी पराभव होतो त्यावेळी चुका सुधारण्यासाठी अतिरिक्त प्रयत्न घेणे गरजेचे असते.
भारतीय संघ दुस-या कसोटीत शानदार पुनरागमन करेल अशी
आशा आहे. भारतीय संघाने चुका सुधारायला हव्या. भारतीय संघ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे, हे विसरता येणार नाही. (पीएमजी)

Web Title: India lost the first Test, though India still have a chance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.