India Maharajas Vs World Giants : भारताचा माजी कर्णधार व BCCI चा सध्याचा अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याला सध्या टीकेला तोंड द्यावे लागत आहे. सौरव गांगुली Legends League Cricket (LLC) च्या दुसऱ्या पर्वात खेळणार असल्याने ही टीका होतेय. १७ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या या लीगमध्ये गांगुलीकडे इंडियन महाराजा या संघाचे कर्णधारपद असणार आहे. इंडियन महाराजा व वर्ल्ड जायंट्स यांच्यात १६ सप्टेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डवर एक विशेष सामना खेळवण्यात येणार आहे. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने हा सामना खेळवला जाणार असल्याची घोषणा आयोजकांनी केली आहे.
गांगुली इंडियन महाराजा संघाचे नेतृत्व करणार आहे आणि इंग्लंडचा वर्ल्ड कप विजेता कर्णधार इयॉन मॉर्गन याच्याकडे वर्ल्ड जायंट्सचे कर्णधारपद आहे. या लीगमध्ये आशियाई संघही असणार आहे आणि त्यात पाकिस्तानी खेळाडूंच्या समावेशावरून आधीच टीका सुरू आहे. पण, सध्या गांगुलीच्या या लीगमधील समावेशाबाबत टीका सुरू आहे. BCCI चा अध्यक्ष असूनही एका खाजगी लीगमध्ये गांगुली कसा खेळू शकतो आणि त्यासाठी पैसे कसे घेऊ शकतो, असा सवाल केला जात आहे. यातून Conflict of Interest ( हितसंबंध जपणे) चा मुद्दाही उपस्थित होत आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे Legends League Cricket T20 (LLC T20) चे संस्थापक व MD रमण रहेजा यांना ICC ने २०१९मध्ये आर्थिक अनियमितता राखल्याने ब्लॅकलिस्ट केले होते. BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याने आधी या लीगमध्ये खेळणार नसल्याचे सांगितले होते, परंतु दोन दिवसांत त्याने आपली भूमिका बदलली. त्याच्या या निर्णयामागे आर्थिक तडजोड असेल का? अशी शंका उपस्थित होत आहे.
Legends League Cricket T20 सीईओ व सह संस्थापक रमण रहेजा यांनी या लीगमध्ये खेळण्यासाठी गांगुलीने किती पैसे घेतलेय, या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. ते म्हणाले, ''स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने होणाऱ्या सामन्यासाठी गांगुलीने एकही पैसा घेतलेला नाही.''
दरम्यान, गांगुली ही एकच मॅच खेळणार आहे की संपूर्ण लीग हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इंडियन महाराजा संघ - सौरव गांगुल ( कर्णधार), वीरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, युसूफ पठाण, एस बद्रीनाथ, इरफान पठाण, पार्थिव पटेल, स्टुअर्ट बिन्नी, एस श्रीसंथ, हरभजन सिंग, नमन ओझा, अशोक दिंडा, प्रग्यान ओझा, अजय जडेजा, आर पी सिंग, जोगिंदर सिंग, रितिंदर सिंग सोढी
रेस्ट ऑफ वर्ल्ड - इयॉन मॉर्गन ( कर्णधार), लेंडल सिमन्स, हर्षल गिब्स, जॅक कॅलिस, सनथ जयसूर्या, मॅट प्रायर, नॅथन मॅक्यलम, जाँटी ऱ्होड्स, मुथय्या मुरलीधरन, डेल स्टेन, हॅमिल्टन मसकात्झा,मश्रफे मोर्ताझा, असघर अफघान, मिचेल जॉन्सन, ब्रेट लीग, केव्हिन ओब्रायन, दिनेश रामदीन,