India New T20 Coach: राहुल द्रविड टीम इंडियाचा अत्यंत कमकुवत प्रशिक्षक असल्याचे सिद्ध होत आहे. राहुल द्रविडच्या प्रशिक्षणाखाली टीम इंडिया यावर्षी ट्वेंटी- २० वर्ल्ड कप स्पर्धेचे विजेतेपद जिंकू शकली नाही. याशिवाय परदेशात जाऊनही टीम इंडियाचा द्विपक्षीय मालिकेत पराभव होत आहे. टीम इंडियाला नुकतेच न्यूझीलंड दौऱ्यावर तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत ०-१ असा पराभव स्वीकारावा लागला होता आणि आता बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वन डेमध्येही भारतीय संघाचा दारूण पराभव झाला. टीम इंडियाला बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात १ विकेट राखून पराभव स्वीकारावा लागला. आता राहुल द्रविडकडून मुख्य प्रशिक्षकपद जाण्याची शक्यता आहे आणि तीन खेळाडू शर्यतीत आहेत.
राहुल द्रविडची प्रशिक्षकपदावरून होणार गच्छंती? BCCI च्या गोटातून मिळाली महत्त्वाची माहिती
महेंद्रसिंग धोनीटीम इंडियाला आयसीसीच्या तीन प्रमुख ट्रॉफी जिंकून देणारा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा भारतीय क्रिकेट संघाचा पुढील प्रशिक्षक होण्याचा दावेदार आहे. द्रविडच्या जागी धोनी टीम इंडियाचा पुढचा प्रशिक्षक झाला, तर तो भारतीय संघाचे नशीब बदलेल. धोनीला वर्ल्ड कपसारख्या स्पर्धा कशा जिंकायच्या हे माहीत आहे. २०२३ चा वन डे वर्ल्ड कप पुढील वर्षी भारतात होणार आहे आणि तो लक्षात घेता टीम इंडियाला धोनीची प्रशिक्षक म्हणून गरज आहे. महेंद्रसिंग धोनीने १५ ऑगस्ट २०२० रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.
वीरेंद्र सेहवागभारताचा माजी स्फोटक सलामीवीर वीरेंद्र सेहवागही टीम इंडियाचा पुढील प्रशिक्षक होण्याचा दावेदार आहे. वीरेंद्र सेहवाग जेवढा आक्रमक फलंदाजीत होता, तेवढाच आक्रमक प्रशिक्षकाच्या बाबतीतही त्याच्याकडून अपेक्षित आहे. भारतीय क्रिकेट संघाला सध्या एका आक्रमक प्रशिक्षकाची गरज आहे, जो त्यांना कोणत्याही परिस्थितीत न घाबरता मुक्तपणे खेळण्याची प्रेरणा देईल. वीरेंद्र सेहवागने टीम इंडियाचा प्रशिक्षक होण्यासाठी यापूर्वी अनेकदा अर्ज केला होता, मात्र रवी शास्त्री आणि राहुल द्रविडमुळे त्याला संधी मिळू शकली नाही.
माईक हेसनन्यूझीलंडचे माजी प्रशिक्षक माइक हेसन हे देखील टीम इंडियाचे पुढील प्रशिक्षक होण्याचे दावेदार आहेत. माइक हेसन यांच्या प्रशिक्षकपदाखाली न्यूझीलंडने २०१५ वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. याशिवाय न्यूझीलंडचा संघ परदेशात जाऊन कसोटी, वन डे आणि ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये द्विपक्षीय मालिकाही जिंकण्यात यशस्वी ठरला आहे. माईक हेसन हे आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे संचालन संचालक आहेत आणि त्याचे कोहलीसोबतचे जबरदस्त बॉन्डिंग दिसून आले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"