मुंबई : भारतीय संघ सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्यामुळे आगामी विश्वचषकात भारताचा संघ जप्रमुख दावेदार आहे, असे बहुतेक जणांना वाटत आहे. पण भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनील गावस्कर यांना मात्र तसे वाटत नाही. भारतापेक्षाही एक संघ विश्वचषकासाठी प्रमुख दावेदार आहे, असे गावस्कर यांचे म्हणणे आहे.
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यामध्ये जाऊन क्रिकेट खेळून आला आहे. या दोन्ही दोशांबरोबरच्या एकदिवसीय मालिकेत भारताने दमदार विजय मिळवला होता. पण त्यापूर्वी भारताचा संघ जेव्हा इंग्लंडच्या दौऱ्यावर गेला होता. इंग्लंडमध्ये भारताला एकदिवसीय मालिकेत पराभव पत्करावा लागला होता.
इंग्लंडमधील भारताच्या कामगिरीवरून गावस्कर यांनी हे विधान केले असावे, असे वाटत आहे. गावस्कर म्हणाले की, " इंग्लंडचा संघ हा चांगलाच समतोल आहे. त्यांच्याकडे चांगला सलामीवीर आहेत. त्यांच्या मधल्याफळीतही चांगले फलंदाज आहेत. त्याबरोबर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्याकडे दर्जेदार अष्टपैलू खेळाडू आहेत. 2015च्या विश्वचषकात इंग्लंडचे आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात आले होते. पण त्यानंतर गेल्या चार वर्षांमध्ये त्यांनी चांगलीच संघबांधणी केली आहे आणि या गोष्टीचे फळ त्यांना यंदाच्या विश्वचषकात मिळू शकते. "
गावस्कर पुढे म्हणाले की, " गेल्या दोन वर्षांमध्ये इंग्लंडच्या संघाने भरपूर क्रिकेट खेळले आहे. त्यांना प्रत्येक संघाबरोबर खेळायचा चांगला अनुभव आहे. भारतीय संघही चांगला फॉर्मात आहे. पण विश्वचषकासाठी प्रमुख दावेदार भारतीय संघ नाही तर इंग्लंडचा संघ आहे."
... तर विश्वचषकातील धोनीचे स्थान येऊ शकते धोक्यातभारतीय संघाने विश्वचषकासाठी आपले अभियान सुरु केले आहे. आता एकदिवसीय संघात कुठलाही बदल करण्यात येणार नाही. हेच भारताचे अंतिम 15 खेळाडू विश्वचषकामध्ये खेळतील, असे संघ व्यवस्थापनाने जाहीर केले आहे. पण भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक यांनी मात्र महेंद्रसिंग धोनीच्या विश्वचषकातील स्थानाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
धोनीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती पत्करलेली आहे. निवड समितीने धोनीला ट्वेन्टी-20 क्रिकेटमधूनही संघाबाहेर काढले आहे. त्यामुळे धोनी हा फक्त एकदिवसीय संघाचाच सदस्य आहे. त्यामुळे धोनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर फारच कमी सामने खेळताना पाहायला मिळतो. धोनी आपला अखेरचा सामना 1 नोव्हेंबरला खेळला होता आणि यापुढचा सामना तो थेट जानेवारीमध्ये खेळणार आहे. त्याचबरोबर विश्वचषकापर्यंत भारतीय संघातील खेळाडूंनी स्थानिक क्रिकेटमध्ये खेळले नाही तरी चालेल, असे बीसीसीआयने सांगितले आहे. त्यामुळे जर धोनी एवढे दिवस क्रिकेटपासून लांब असेल तर त्याच्या संघातील स्थानावर प्रश्नचिन्ह उपस्थिर होऊ शकते, असे गावस्कर यांना वाटते.