दुबई : भारतीय संघाने घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेपाठोपाठ टी२०तही पाहुण्या वेस्ट इंडिजला ३-० ने क्लीन स्वीप दिला. या मालिका विजयासोबतच भारताने टी-२० क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर मजल मारली आहे. भारताच्या खात्यात २६९ रेटिंग गुण झाले आहेत. तर इंग्लंडचेही २६९ रेटिंग गुण आहेत. मात्र त्यांचे एकूण गुण हे १०,४८४ तर इंग्लंडचे एकूण गुण १०,४७४ असल्याने त्यांची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे.
त्यांच्यापाठोपाठ पाकिस्तान (२६६) तिसऱ्या, न्यूझीलंड(२५५) चौथ्या आणि दक्षिण आफ्रिका (२५३) पाचव्या स्थानी आहे. ऑस्ट्रेलियाने नुकतीच श्रीलंकेविरुद्धची मालिका ४-१ अशा फरकाने जिंकल्याने ते २४९ रेटिंग गुणासह सहाव्या क्रमांकावर आहेत. त्यानंतर अनुक्रमे वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेशचा नंबर लागतो.
Web Title: India number one in T20
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.