कोलकाता, दि. 21 - इडन गार्डन्सवर खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या वन-डे सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 50 धावांन धुव्वा उडवत आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर उडी घेतील आहे. तर प्रथम क्रमांकावर असलेला द.आफ्रिकाचा संघ दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. तर दुसऱ्या स्थानावरील ऑस्ट्रेलिया तिसऱ्या स्थानावर घसरला आहे. आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत भारत सध्या प्रथम क्रमांकावर आहे. तर टी 20 मध्ये पाचव्या स्थानावर आहे.
आयसीसी वनडे क्रमवारीत भारत 119 गुणासह प्रथम क्रमांकावर आहे. तर द. आफ्रिकेचेही 119 गुण आहेत. मात्र काही दश अंश गुणामुळे भारत प्रथम क्रमांकावर आहे तर आफ्रिका दुसऱ्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाला मात्र दोन गुणांचे नुकसान झालं आहे. 117 वरुन त्यांचे गुण 115 झालं आहे. भारताविरोधातील दोन पराभवामुळे त्यांची क्रमवरीत घसरण झाली आहे. चौथ्या स्थानावर इंग्लंड आहे. त्यांच्या नावार 113 गुण आहेत . भारताला प्रथम क्रमांवर रहायचे असल्यास ऑस्ट्रेलियाविरोधातील मालिका जिंकने गरजेच आहे. अन्यथा भारताची दुसऱ्या स्थानावर घसरण होईल.
आज झालेल्या सामन्यात गोलंदाजांनी केलेल्या धारधार माऱ्याच्या जोरावर भारतानं दुसऱ्या वन-डेत ऑस्ट्रेलियाचा 50 धावांनी पराभव केला. 253 धावांचा पाठलाग करणाऱ्या ऑस्ट्रेलियाला भारतीय गोलंदाजापुढे हे लक्ष डोंगराएवढे भासले. भारताकडून भुवनेश्वर कुमार, चहल आणि कुलदिप यादव यांनी टिच्चून मारा करत ऑस्ट्रेलियाचा फलंदाजांना कोणतीच संधी दिली नाही. ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सुरुवातीला भुवनेश्वरनं दोन धक्के दिले. तर डावाच्या मध्ये चहलनं दोघांची शिकार केली. भुवनेश्वर, चहल आणि पांड्यानं ऑस्ट्रेलियाला अडचणीत टाकले असताना त्यात भर म्हणून कुलदिपनं सलग तीन फलंदाजांना बाद करत त्यांच कंबरडेच मोडलं. 32 व्या षटकांतील दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या चेंडूवर कुलदीपनं ऑस्ट्रेलियाच्या तीन फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला. हॅट्रिक घेताना कुलदीपनं अनुक्रमे मॅथ्यू वेड, अॅश्टन अगर आणि पॅट कमिन्स यांना बाद केलं. यापूर्वी 19 वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत 2014 मध्ये स्कॉटलंड संघाविरुद्ध खेळताना कुलदीपनं हॅटट्रीक घेतली होती. भारताकडून हॅटट्रीक घेणारा कुलदीप यादव हा तिसरा खेळाडू ठरला आहे. याआधी चेतन शर्मानं 1987 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध तर कपील देवनं श्रीलंकेविरुद्ध 1991 मध्ये हॅटट्री घेतली होती.