नवी दिल्ली : बांगलादेशामध्ये १ ते १३ ऑक्टोबर या कालावधीत आशिया क्रिकेट परिषदेच्या (एसीसी) वतीने होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली. इंग्लंडविरुद्ध नुकताच टी-२० मालिका खेळणारा १५ सदस्यांचा संघ या स्पर्धेसाठी कायम ठेवण्यात आला आहे. स्पर्धेचा अंतिम सामना १५ ऑक्टोबरला होईल. ७ ऑक्टोबरला भारताचा सामना कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्ध होईल.
तानिया भाटिया आणि सिमरन बहादूर यांना स्टँड बाय म्हणून संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंड दौऱ्यात टी-२० मालिकेत दोन्ही खेळाडूंना अंतिम संघात स्थान मिळाले नव्हते. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारतीय संघ विक्रमी सातव्यांदा आशिया चषक उंचावण्याचा प्रयत्न करेल. भारतीय महिला सलामीला श्रीलंकेविरुद्ध खेळून आपल्या मोहिमेला सुरुवात करतील.
भारतीय संघ हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्स, सब्बीनेनी मेघना, ऋचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, राधा यादव आणि के. पी. नवगिरे. राखीव : तानिया भाटिया, सिमरन दिल बहादूर.