अहमदाबाद - आयसीसी वन डे विश्वचषकात भारत विरुद्ध पाकिस्तानदरम्यान येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर १५ ऑक्टोबर रोजी 'हाय व्होल्टेज' सामना खेळला जाईल. या सामन्यासाठी विमान कंपन्यांनी तिकीट दर अव्वाच्या सव्वा वाढविले आहेत. हॉटेलच्या खोल्यांचे भाडे याआधीच वाढविण्यात आले आहे. काही पंचतारांकित हॉटेलच्या एका खोलीचे दिवसाचे भाडे एक लाखापर्यंत करण्यात आले आहे.
१४ ऑक्टोबरसाठी दिल्ली- अहमदाबाद आणि मुंबई- अहमदाबाद दरम्यानच्या विमानसेवेचे भाडे गगनाला भिडले. दिल्ली आणि मुंबईहून अहमदाबादला जाण्यासाठी विविध विमान कंपन्यांचे राऊंड ट्रिप भाडे (जाणे-येणे) २० ते ३५ हजारापर्यंत वाढविण्यात आले. विमान प्रवासाचे सध्याचे दर पाच हजार रुपये आहेत. सूत्रानुसार सध्या दिल्ली अहमदाबाद आणि मुंबई-अहमदाबाद प्रवासासाठी राऊंड ट्रीपसाठी किमान ५ हजार रुपये आकारले जात आहेत.
आकारले जात आहेत. नागरी विमानसेवेशी संबंधित एका कंपनीचे सीईओ आणि सहसंस्थापक निशांत पिट्टी म्हणाले, भारत पाक सामन्याच्या तारखेची अधिकृत घोषणा झाल्यानंतर एका दिवसात हॉटेलचे भाडे वाढले होते. आता विमान प्रवासही महाग झाला. लोकांनी तीन महिन्या आधी बुकिंग केले तरी विमान प्रवास दर सामान्य दराच्या तुलनेत सहापटीने वाढले आहेत.' ते पुढे म्हणाले, विमान प्रवासासाठी तिकीट दर शोधणाऱ्यांची संख्या आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. इच्छुक असलेल्यांनी तर तिकिटेदेखील बुक केली. "
मागणी उपलब्धतेनुसार दरवाढ
जाणकारांच्यामते भारत-पाक सामन्यासाठी सप्टेंबरअखेरपर्यंत विमान प्रवास दर गगनाला भिडण्याची शक्यता आहे. दिल्ली- मुंबई ते अहमदबाद असा प्रवास करणायांच्या प्रवास भाड्यात दुपटीने वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
राऊंड ट्रिपसाठी ३१ हजार ५५२ रुपये
चेन्नई-अहमदाबाद या नॉन स्टॉप राऊड ट्रिप चेन्नई-अहमदाबाद या नॉन स्टॉप राऊड ट्रिप प्रवासासाठी एका व्यक्तीला ३२ हजार ५५२ रुपये मोजावे लागले आहेत. १५ जुलै रोजी म्हणजे सामन्याच्या तीन महिने आधी हे तिकीट बुक झाले. सामान्य स्थितीत अशा राऊड दिपसाठी नऊ हजार रुपये खर्च येतो. १४ ते १६ ऑक्टोबर या कालावधीत सर्व विमान कंपन्यांच्या तिकिटाच्या किमती गगनाला भिडलेल्या आहेत.
एकाच सामन्यासाठी प्रचंड उत्साह
अहमदाबाद येथे विश्वचषकाचा सलामीचा सामना अंतिम सामना आणि भारत-पाक सामना अशा आकर्षक लढती रंगणार आहेत. उद्घाटन आणि समारोपाच्या सामन्याबाबत चाहत्यांमध्ये उत्साह दिसत नाही, पण भारत- पाक लढतीवर उड्या पडत आहेत. चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह असल्याने हॉटेल बुकिंग आणि विमान प्रवास या दोन गोष्टीवर कितीही रक्कम मोजण्याची अनेकांची तयारी दिसते. स्थानिक पंचतारांकित हॉटेलच्या खोल्या तीन महिने आधी बुक झाल्या. त्यासाठी एक लाख रुपयापर्यंत रक्कम मोजावी लागली.