Join us  

Asia Cup 2023: मोठी बातमी! आशिया चषकासाठी भारत-पाकिस्तान एकाच गटात; जय शाह यांची घोषणा 

Asia Cup 2023, IND vs PAK: आशिया चषक 2023साठी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान एकाच गटात असणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2023 11:18 AM

Open in App

नवी दिल्ली : बीसीसीआयचे (BCCI) सचिव आणि आशियाई संघटनेचे (ACC) अध्यक्ष जय शाह यांनी 2023-24 मधील क्रिकेट स्पर्धांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. खरं तर आगामी पुरूष आशिया चषकाच्या स्पर्धेसाठी कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान हे एकाच गटात असणार आहेत. आशिया चषकात एकूण 13 साखळी सामने होणार असून 4 संघ उपांत्यफेरीसाठी पात्र ठरतील. लक्षणीय बाब म्हणजे सप्टेंबर 2023मध्ये आशिया चषकाचा थरार पार पडणार आहे.

स्पर्धेच्या ठिकाणावरून वाद दरम्यान, या स्पर्धेसाठी एकूण 6 संघ सहभागी होणार आहेत. मात्र, स्पर्धेचे ठिकाण अद्याप निश्चित झालेले नाही. परंतु आगामी आशिया चषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे आहे, मात्र बीसीसीआयने भारतीय संघ पाकिस्तानात जाणार नसल्याचे या आधीच स्पष्ट केले होते. याशिवाय ही स्पर्धा एखाद्या तटस्थ ठिकाणी आयोजित करावी अशी मागणी देखील बीसीसीआयने आशियाई संघटनेकडे केली होती.

मात्र, बीसीसीआयविरूद्ध पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने देखील आक्रमक पवित्रा घेत टीका केली होती. पीसीबीने लांबलचक पत्रक काढून भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकावर बहिष्कार टाकू अशी धमकी दिली होती. मात्र आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डात खूप बदल झाला आहे. तत्कालीन पीसीबीचे अध्यक्ष रमीझ राजा यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. पण आता त्यांची अध्यक्षपदावरून हकालपट्टी झाली आहे. पीसीबीच्या अध्यक्षपदी नजम सेठी यांची निवड झाली आहे. 

आशिया चषकासाठी संघ - गट अ - भारत, पाकिस्तान, क्वालिफायर 1. गट ब - बांगलादेश, अफगाणिस्तान, श्रीलंका. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :एशिया कप 2022भारत विरुद्ध पाकिस्तानजय शाहबीसीसीआयपाकिस्तान
Open in App