India Pakistan, Asia Cup 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिका सुरू होणार आहे. परंतु आशिया चषक 2023 बद्दल सातत्याने चर्चा होत आहे. टीम इंडिया आशिया चषकासाठी पाकिस्तानला जाणार नसल्याचे BCCI ने स्पष्ट केले आहे. तेव्हापासून हा गदारोळ झाला आणि पाकिस्तान क्रिकेटमधील अंतर्गत वादही चव्हाट्यावर आले आहेत. आता पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. कारण खुद्द पाकिस्तानी खेळाडूच आशिया चषक पाकिस्तान बाहेर आयोजित करण्याचे समर्थन करताना दिसत आहेत.
पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू अब्दुल रझाक म्हणाला की, जर आशिया चषक 2023 मध्ये पाकिस्तान बाहेर हलवला गेला तर तो क्रिकेटसाठी चांगला निर्णय असेल. भारत आणि पाकिस्तानचे सामने केवळ ICC च्या स्पर्धांमध्येच होतात. आशिया चषक दुबई किंवा बाहेर कुठेतरी हलवला तर बरे होईल. क्रिकेट आणि क्रिकेटपटूंसाठी ही स्पर्धा होणे महत्त्वाचे आहे, जर तुम्ही तसे केले नाही तर चांगले होणार नाही. दोन्ही मंडळांनी समोरासमोर बसून परस्पर सामंजस्याने समस्या सोडवाव्यात. जेणेकरून आशिया कपचा वाद संपुष्टात येईल, असा सल्ला त्याने दिले.
'आम्हाला खूप त्रास होईल'
"ICC ने आपली शक्ती वापरावी आणि BCCI ला स्पर्धेत सहभागी होण्यास सांगावे. टीम इंडियाशिवाय आशिया कप आयोजित केला तर अनेक प्रायोजक माघार घेतील आणि पैसेही येणार नाहीत. आमचंही खूप नुकसान होईल," पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे माजी अध्यक्ष खालिद महमूद म्हणाले.
BCCI च्या निर्णयानंतर वाद
ICC च्या भविष्यातील कार्यक्रमानुसार आशिया कप 2023 पाकिस्तानमध्ये होणार आहे. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव टीम इंडिया पाकिस्तानचा दौरा करणार नसल्याचे भारताने आशियाई क्रिकेट परिषदेत स्पष्ट केले आहे. टीम इंडिया आशिया चषक तेव्हाच खेळेल जेव्हा ती पाकिस्तानमधून बाहेर जाईल. मात्र जर भारताने आशिया कपसाठी पाकिस्तानचा दौरा केला नाही, तर त्यांचा संघ 2023 च्या एकदिवसीय विश्वचषकासाठी भारताचा दौरा करणार नाही आणि बहिष्कार टाकेल, अशी धमकी पाकिस्तानकडून देण्यात आली होती. त्यानंतर पाकिस्तानच्या अनेक माजी खेळाडूंच्या वतीने बीसीसीआय विरोधात वक्तव्ये करण्यात आली होती.
Web Title: India Pakistan Asia Cup 2023 Pakistan strategy backfired on them Former cricketers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.