Join us  

भारत-पाकिस्तान मालिका विचारातच घेत नाही, कारण...; पाकिस्तान क्रिकेट मंडळाचं वादग्रस्त विधान

2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघावर डकवर्थ लुईस नियमानुसार 85 धावांनी विजय मिळवला होता.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 3:21 PM

Open in App
ठळक मुद्दे2013 पासून उभय देशांमध्ये द्विदेशीय मालिका झालेली नाही2019च्या वर्ल्ड कपमध्ये दोन्ही संघ अखेरचे एकमेकांशी भिडले होते

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला क्रिकेट सामना हा क्रीडा चाहत्यांसाठी पर्वणीच असतो. उभय देशांमधील क्रिकेट सामना पाहण्यासाठी स्टेडियम खचाखच भरलेलं असतं, डिजिटल प्लॅटफॉर्मवरही नेटकऱ्यांची झुंबड उडालेली असते. मात्र, हे दोन कट्टर प्रतिस्पर्धी 2013 पासून एकमेकांविरुद्ध द्विदेशीय मालिका खेळलेले नाहीत. 2012मध्ये दोन्ही देशांमध्ये राजकीय तणाव निर्माण झाल्यानंतर उभय देशांमध्ये द्विदेशीय मालिकाच झालेली नाही. त्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धा वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, आशिया चषक आदी स्पर्धांमध्येच भारत-पाकिस्तान सामना पाहायला मिळतो.

ENG v PAK : पाकिस्तानी क्रिकेटपटूंची राहण्यासाठी सोय फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये नाही तर...

पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे ( पीसीबी) मुख्य कार्यकारी अधिकारी एहसान मणी यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट मालिका ही जागतिक क्रिकेटसाठी मोठ्या फायद्याची आहे, परंतु आता भारताविरुद्ध मालिका खेळण्याचा विचार करणंच सोडून दिल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वार्षिक वेळापत्रकात आम्ही भारतीय संघाविरुद्धच्या मालिकेचा विचारच करत नाही, असं त्यांनी म्हटलं. 2019च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारतानं सर्फराज अहमदच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पाकिस्तान संघावर डकवर्थ लुईस नियमानुसार 85 धावांनी विजय मिळवला होता.

मणी यांनी सांगितले की, ''भारत सरकारच्या धोरणांमुळे भारत आणि पाकिस्तान यांच्या द्विदेशीय मालिका शक्य होऊ शकत नाही. या देशांमधील मालिका ही अन्य मालिकांपेक्षा अधिक महसूल देणारी आहे. पाकिस्तान-भारत यांच्यातील सामना सर्वाधिक पाहिला जातो. आयसीसी आणि आशिया चषक या व्यतिरिक्त उभय देश एकमेकांविरुद्ध खेळत नाही. त्याला भारत सरकारचं धोरण कारणीभूत आहे.''

''भारत-पाकिस्तान हे जागतिक क्रिकेटसाठी फायद्याचे आहे. पण आता आम्हीही आमच्या वेळापत्रकात भारताविरुद्धच्या मालिकेचा विचार करणं सोडून दिलेलं आहे,''असेही ते म्हणाले. यापूर्वी पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू शोएब अख्तर, वकार युनिस यांनीही भारत-पाकिस्तान मालिकेची मागणी केली होती.  

अन्य महत्त्वाच्या बातम्या

दिग्गज खेळाडूच्या मुलाचा 'हॉट' अभिनेत्रीसोबत साखरपुडा; फोटो व्हायरल 

... म्हणून शिखर धवनची पत्नी किक बॉक्सिंग शिकली; सत्य जाणून बसेल धक्का! 

महेंद्रसिंग धोनीनंतर विराट कोहलीचा लॉकडाऊन लूक व्हायरल; डोळ्यांवर बसणार नाही विश्वास!

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानपाकिस्तान