Join us  

भारत-पाकिस्तान पुन्हा एकदा मार्च महिन्यात भिडणार

या सामन्यासाठी माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2019 6:47 PM

Open in App

मुंबई : भारत विरुद्ध पाकिस्तान असा क्रिकेटचा सामना मार्च महिन्यात खेळवण्यात येणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे एकाच गटामध्ये असल्यामुळे त्यांच्यामध्ये सामना होणार, हे स्पष्ट झाले आहे. या सामन्यासाठी माजी विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी भारताला शुभेच्छा दिल्या आहे.

ही स्पर्धा १० ते २४ मार्च या कालावधीमध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेतच्या 'ब' गटामध्ये भारत आणि पाकिस्तान यांचा समावेश करण्यात आला आहे. 'ब' गटामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यासह इंग्लंड, यजमान दक्षिण आफ्रिका, नामिबिया आणि वेल्स या संघाचा समावेळ करण्यात आला आहे. या स्पर्धेच्या 'ब' गटामध्ये ऑस्ट्रेलिया, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंका या संघाचा समावेश आहे.

गेल्या काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. त्यानंतरही पाकिस्तानबरोबर कोणात्याही प्रकारचे सामना खेळू नयेत, अशी भूमिका काही चाहत्यांनी घेतली आहे. पण तरीही भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना होणार आहे.

गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे ५० वर्षांवरील खेळाडूंच्या क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी हा विश्वचषक दक्षिण आफ्रिकेत खेळवण्यात येणार आहे. या विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ भिडणार आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध पाकिस्तानभारतकपिल देवपाकिस्तान