इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. यंदाची आयपीएल संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे होणार असल्याची माहिती चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी दिली. पुढील आठवड्यात आयपीएलच्या वेळापत्रक जाहीर केले जाईल. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळासमोर ( बीसीसीआय) वेगळंच संकट उभे राहिले आहे. आयपीएलपूर्वी भारतीय संघाची आतंरराष्ट्रीय मालिका खेळवण्यासाठी भागधारकांकडून बीसीसीआयवर दबाव टाकला जात आहे.
IPL 2020चे स्थळ ठरले अन् आता तारीख, वेळही निश्चित झाली?; जाणून घ्या सर्व माहिती!
कोरोना व्हायरसमुळे अनेक आंतरराष्ट्रीय मालिका रद्द झाल्या आहेत. मार्चमध्ये होणारी दक्षिण आफ्रिकेविरुद्धची मालिका रद्द झाल्यानंतर बीसीसीआयला श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्याविरुद्धच्या मालिकाही स्थगित कराव्या लागल्या. त्यात इंग्लंडचा भारत दौराही रद्द होण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे भागधारकांकडून बीसीसीआयवर दबाव टाकला जात आहे. आयपीएल सुरू होण्यापूर्वी टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात ट्वेंटी-20 मालिका खेळवावी, असा प्रस्ताव त्यांच्याकडून ठेवला जात आहे.
इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली आहे. त्यानंतर इंग्लंड-पाकिस्तान यांच्यात मालिका होणार आहे. भारतीय संघाच्या आंतरराष्ट्रीय मालिकेबाबत बोलायचे झाल्यास संघ डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. तत्पूर्वी आयपीएल होणार आहे. त्यासाठी बीसीसीआयच्या करारबद्ध खेळाडूंचे सराव शिबिर अहमदाबाद येथील मोटेरा स्टेडियमवर भरवले जाणार आहे.
कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा, त्यापासून वाचायचं असेल तर...; खासदाराचं अजब लॉजिक
मार्चमध्ये भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातली मालिका रद्द झाल्यानंतर उभय संघ ऑगस्टमध्ये एकमेकांना भिडणार होते. याबाबत ब्रिजेश पटेल यांनी सांगितले,''गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीत यावरची चर्चा केली जाईल.''
विराट कोहलीचा RCB जिंकू शकतो IPL 2020; भारताच्या माजी क्रिकेटपटूनं सांगितलं 'भारी' लॉजिक!