India Playing XI 2nd T20 vs SL : ऋतुराज गायकवाडच्या माघारीने संजू सॅमसनला मिळाली संधी; दुसऱ्या सामन्यात Rohit Sharma करणार हे बदल

India Playing XI 2nd T20 vs Sri Lanka : भारत-श्रीलंका यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना आज धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2022 04:21 PM2022-02-26T16:21:12+5:302022-02-26T16:21:37+5:30

whatsapp join usJoin us
India Playing XI 2nd T20 vs Sri Lanka : Sanju Samson to get another chance in injured Ruturaj Gaikwad’s place, Kuldeep yadav could return  | India Playing XI 2nd T20 vs SL : ऋतुराज गायकवाडच्या माघारीने संजू सॅमसनला मिळाली संधी; दुसऱ्या सामन्यात Rohit Sharma करणार हे बदल

India Playing XI 2nd T20 vs SL : ऋतुराज गायकवाडच्या माघारीने संजू सॅमसनला मिळाली संधी; दुसऱ्या सामन्यात Rohit Sharma करणार हे बदल

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

India Playing XI 2nd T20 vs Sri Lanka : भारत-श्रीलंका यांच्यातला दुसरा ट्वेंटी-२० सामना आज धर्मशाला येथे खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वी भारताला दुखापतीमुळे आणखी एक झटका बसला अन् सलामीवीर ऋतुराज गायकवाड ( Rututraj Gaikwad) याला मालिकेतून माघार घ्यावी लागली. पहिल्या सामन्यापूर्वी सराव करताना त्याच्या मनगटाला मार लागला आणि त्याला अंतिम ११मध्ये स्थान पटकावता आले नाही. त्यानंतर शनिवारी BCCIने  ऋतुराज मालिकेतच खेळणार नसल्याचे जाहीर केले. आता तो लोकेश राहुल, सूर्यकुमार यादव यांच्यासह बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत दाखल होणार आहे.

ऋतुराजच्या माघारीमुळे संजू सॅमसनला आणखी एक संधी मिळणार आहे. कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma) विजयी संघात फार बदल करण्याची अपेक्षा कमीच आहे. भारताने पहिल्या सामन्यात ६२ धावांनी विजय मिळवून तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. या सामन्यात दीपक हुडाने पदार्पण केले होते, परंतु त्याच्याजागी आजच्या सामन्यात कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. IND vs SL 2nd T20 Live Updates  

पहिल्या सामन्यात रोहित व इशान किशन यांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली होती. रोहित ४४ धावांवर माघारी परतल्यानंतर इशानने ८६ धावांची खेळी साकारली, तर श्रेयस अय्यरने झटपट अर्धशतक झळकावले होते.  

भारताचा संभाव्य संघ ( India Playing XI 2nd T20)
१. रोहित शर्मा ( कर्णधार)
२. इशान किशन ( यष्टिरक्षक)
३. संजू सॅमसन
४. श्रेयस अय्यर
५. रवींद्र जडेजा
६. वेंकटेश अय्यर
७. दीपक हुडा/कुलदीप यादव
८. भुवनेश्वर कुमार
९. हर्षल पटेल
१०. जसप्रीत बुमराह ( उप कर्णधार)  
११. युझवेंद्र चहल 

 

Web Title: India Playing XI 2nd T20 vs Sri Lanka : Sanju Samson to get another chance in injured Ruturaj Gaikwad’s place, Kuldeep yadav could return 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.