Asia Cup 2023, India Playing XI vs PAK: आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातला दुसरा सामना रविवारी कोलंबो येथे होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ आशिया चषकात आतापर्यंत अपराजित असलेल्या बाबर आजमच्या नेतृत्वाखालील संघाचा सामना करणार आहे. IND vs PAK यांच्यातला साखळी फेरीतील सामना पावसामुळे रद्द करावा लागला होता. पण, आता उद्याचा सामना पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे, न झाल्यास राखीव दिवस आहेच. मात्र, रोहितसमोर नवा पेच निर्माण झाला आहे. KL Rahul हा तंदुरुस्त होऊन परतला आहे आणि जसप्रीत बुमराह हाही परतला आहे. त्यामुळे आता प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी द्यायची हा प्रश्न आहे.
इतरांपेक्षा माझ्यावर कामाचा दुप्पट-तिप्पट भार, बाकीचे...! हार्दिक पांड्याचा मोठा दावा
जसप्रीत बुमराह त्याच्या बाळाच्या जन्मासाठी मुंबईत आला होता आणि आता तो पुन्हा श्रीलंकेत परतला आहे. जसप्रीतच्या अनुपस्थितीत नेपाळविरुद्ध मोहम्मद शमीला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळाली होती. शमीने ७ षटकांत १ विकेट घेतली. पण, आता जसप्रीत परतला आहे, मग कोणाला डच्चू मिळेल?
- शार्दूल ठाकूरला पाकिस्तानविरुद्ध फलंदाजीत कमाल करता आली नाही आणि गोलंदाजीची संधी मिळाली नाही. नेपाळविरुद्धही तो महागडा ठरला होता.
- मोहम्मद शमीने नेपाळविरुद्ध १ विकेटच घेतली असली तरी त्याची इकॉनॉमी चांगली होती, तर मोहम्मद सिराजने ३ विकेट्ससाठी ६१ धावा दिल्या होत्या. पण, तो पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात महत्त्वाचा शिलेदार असेल.
लोकेश राहुल परतल्याने प्लेइंग इलेव्हनमधून कोणत्या फलंदाजाला कमी करायचे हाही प्रश्न आहेच. राहुलच्या अनुपस्थितीत भारताने संजू सॅमसन, इशान किशन व सूर्यकुमार यादव यांना पाचव्या क्रमांकावर संधी दिली आणि यापैकी इशान यशस्वी ठरलेला दिसतोय. त्याने मागील चार वन डे सामन्यांत ५२, ५५, ७७ व ८२ धावा केल्या. पाकिस्तानविरुद्ध जिथे भारताचे आघाडीचे ४ फलंदाज अपयशी ठरले, तिथे इशानने ८२ धावा करून हार्दिकसह डाव सावरला. अशात राहुलच्या पुनरागमनानंतर इशानला बाहेर करणे योग्य ठरणार नाही.
पाकिस्तानविरुद्ध भारतीय संघ अतिरिक्त फिरकीपटूसह मैदानावर उतरू शकतो. अशात एक जलदगती गोलंदाजाला बाहेर बसावे लागेल हे निश्चित. हार्दिक पांड्या हा जलदगती गोलंदाजीचा पर्याय असल्याने शमीला उद्या पुन्हा बाकावर बसवले जाऊ शकते.
भारताची प्लेइंग इलेव्हन ( India Playing XI vs PAK )रोहित शर्माशुबमन गिलविराट कोहलीश्रेयस अय्यर/लोकेश राहुलइशान किशन हार्दिक पांड्यारवींद्र जडेजामोहम्मद शमी/अक्षर पटेलकुलदीप यादवजसप्रीत बुमराहमोहम्मद सिराज